[Marathi] १९ ऑक्टोबरच्या सुमारास संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईत पाऊस परतणार, तीव्र सरींची शक्यता

October 16, 2019 12:21 PM | Skymet Weather Team

नैऋत्य मॉन्सूनने माघार घेतली असली तरी मुंबईत पावसाचा जोर संपलेला नाही. हवामान मॉडेल्स सूचित करीत आहेत की लवकरच मध्यम पाऊस शहरात परत येईल.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील हवामान प्रामुख्याने वाढत्या तापमानासह कोरडे राहिले आहे आणि त्यामुळे अस्वस्थतेचे प्रमाण वाढले आहे.

तथापि, १९ ऑक्टोबर रोजी पुन्हा पाऊस सुरू होणार असल्याने या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. २० आणि २१ ऑक्टोबर रोजी मुंबई आणि उपनगरामध्ये एक किंवा दोन तीव्र सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊल पडेल.

पाऊस परतण्याचे कारण आहे सध्या लक्षद्वीप जवळ उपस्तित असलेली चक्रवाती परिस्थिती, जी लवकरच कमी दाबाच्या पट्ट्यात परिवर्तित होईल. ही प्रणाली पश्चिम / वायव्य दिशेने उत्तर कोकण किनारपट्टीकडे जाईल आणि संघटित कमी दाबाच्या पट्ट्यात तीव्र होईल, ज्यामुळे मुंबई आणि ठाणे, डहाणू आणि दक्षिण गुजरातच्या आसपासच्या भागात याचा परिणाम दिसेल.

काही भागांत जोरदार सरींमुळे बर्‍याच सखल भागात पाणी साचू शकते आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ शकते. तथापि, पाऊस हा सतत पडणार नसून त्यामुळे तीव्र व्यत्यय निर्माण होणार नाही.

शिवाय, १९ आणि २२ ऑक्टोबर दरम्यान तापमानातही लक्षणीय घट होईल.

Image Credits – Whatsup life 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES