मुंबई आणि कोकणात पूर्व मॉन्सून गडगडाटी पाऊस लवकरच परतण्याची शक्यता आहे. असे घडलयास या क्षेत्रावरील सुमारे महिनाभर असलेला कोरडा कालखंड संपेल.
स्कायमेट हवामानतज्ञांच्या मते, कोकण किनारपट्टीलगत उत्तर-पूर्व अरबी समुद्रावर एक चक्रवाती परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे किनारीभागातील शहरांमध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे, डहाणू, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पावसाला अनुकूल परिस्थितीत निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
याकाळात वीजा आणि गडगडाटी परिस्थिती देखील अनुभवली जाऊ शकते. तथापि, पावसाची तीव्रता केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपा पर्यंत मर्यादित राहील. ही हवामान प्रणाली पुरेशी मजबूत नसल्याने पावसावर अधिक प्रभाव पाडण्यास सक्षम नसेल.
दरम्यान ही मॉन्सून पूर्व-गतिविधी असल्यामुळे कमाल तापमानावर त्याचा फारसा प्रभाव पडणार नाही. या हंगामात उष्णता हा मुख्य घटक आहे. संभाव्य चक्रवाती परिस्थिती कोंकण भागातील आर्द्रता वाढविण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, दुपारच्या सुमारास वाढलेल्या उष्णतेसह, वातावरणात उपलब्ध असलेल्या आर्द्रतेमुळे ढगांचा विकास होऊ शकतो व परिणामी गडगडाटी पाऊस होतो. परंतु वर सांगितल्याप्रमाणे, हे सर्व दिवसाच्या उत्तररार्धात घडेल. तसेच समुद्राकडून येणाऱ्या वार्यांमुळे संध्याकाळी वातावरण थोडे आल्हाददायक राहू शकते.
उर्वरित देशाच्या तुलनेत, मुंबई आणि आसपासच्या भागात मॉन्सून पूर्व-गतिविधी जास्त दिसत नाही. प्रत्यक्षात याकाळात मुंबईत वातावरण कोरडेच राहते, सामान्यतः सरासरी पाऊस १ मि.मी. पेक्षा कमी राहतो.
मुंबईतील मॉन्सून पूर्व-गतिविधी दक्षिणपश्चिम मॉन्सूनच्या आगमनाच्या म्हणजेच सामान्यत: १० जूनच्या जवळपास वाढते.
Image Credit:en.wikipedia.org
Any information taken from here should be credited to skymetweather.com