[Marathi] मुंबईत पावसाचा जोर आणखी कमी होणार, गणपती विसर्जन सुरळीत पार पडणार

September 10, 2019 10:12 AM | Skymet Weather Team

पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत पावसाची तीव्रता कमीच राहण्यामुळे, ‘गणपती विसर्जन’ मध्ये कोणत्याही अडथळ्याची अपेक्षा नाही आणि विसर्जन सुरळीत पार पडेल.

गेल्या दोन ते तीन दिवसांत मुंबईत वेगवेगळ्या तीव्रतेचा पाऊस पडला आहे. गेल्या २१ तासांत ५४ मिमी पाऊस पडला आहे, त्यापैकी ६ तासांच्या कालावधीत ४९ मिमी पाऊस पडला. मात्र काल दुपारपासूनच पाऊस कमी होऊ लागला आणि संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळी फक्त ५ मिमी पावसाळी नोंद झाली.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, किनारपट्टी ट्रफ कमकुवत झाल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस मुंबई व उपनगरामध्ये जोरदार पावसाची अपेक्षा नाही आहे. एक किंवा दोन स्थानिकीकृत तीव्र सरींसह केवळ हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय, तीव्रता अगदी कमी असल्याने, ‘गणपती विसर्जन’ मध्ये कोणत्याही अडथळ्याची आम्हाला अपेक्षा नाही आणि विसर्जन सुरळीत पार पडणार.

पुढे १४ किंवा १५ सप्टेंबरच्या सुमारास पाऊस वाढणे अपेक्षित आहे, ज्यात शहर आणि लगतच्या भागांत एक किंवा दोन तीव्र सरींसह मध्यम पाऊस दिसू शकतो. आतापर्यंत, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता दिसून नाही येत आहे ज्यामुळे पूर किंवा वाहतुकीची कोंडी होण्याची सध्या तरी शक्यता नाही आहे.

२०१६ मध्ये नोंदविण्यात आलेल्या ७५६.५ मिलिमीटर मासिक रेकॉर्ड मुंबईने सहजतेने पार केले. मुंबई शहरासाठी सप्टेंबरमधील विक्रम ९२० मिमी आहे.

Image Credits – INRootz

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES