गेल्या २४ तासांत मुंबईत ९ मिमी पावसाची नोंद झाली. काल, पहाटे काही मुसळधार सरींची नोंद झाली. तथापि, दुपारनंतर पावसाच्या तीव्रतेत घट दिसून आली आणि त्यानंतर फारच कमी पाऊल पडला आहे.
आज पहाटे शहरात काही भागांत तुरळक पाऊस पडला आहे.
स्कायमेट हवामानानुसार पूर्व भागांत जसे खारघर आणि आसपास आज काही मध्यम सरींची शक्यता आहे.
पावसाचा जोर मुंबई आणि आसपास आज संध्याकाळी वाढणे अपेक्षित आहे आणि काही मध्यम सरी बरसतील. तथापि, पावसाचा जोर इतका नाही राहणार कि रहिवाशांना यायला जायला त्रास होईल. तसेच,गंभीर पाणी साचण्याची समस्या नाही दिसून येईल.
उद्या पावसाचा जोर परत कमी होणे अपेक्षित आहे.
शिवाय, पावसाचा जोर कमी राहण्यामुळे हवामान दमट राहिल आणि तापमानात देखील वाढ दिसून येईल. आर्द्रता वाढल्यास अस्वस्थता वाढेल.
Image Credits – The Indian Express
Any information taken from here should be credited to Skymet Weather