महाराष्ट्र राज्याच्या सर्वे भागात अजुनही उष्ण तापमान सहन करावे लागत आहे ,या उष्णतेच्या लाटेपासून लवकर राज्याला सुट्टी मिळेल असे दिसत नाही. शिवाय, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत उष्णतेची लाट मुक्काम ठोकून आहे.
तथापि, कोकण विभागात हवामान उष्ण आणि दमट राहील. विदर्भातील तापमान सतत वाढत असून ४५ अंशापर्यंत नोंदविले जात आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत तापमान ४५ अंशांच्या आसपास नोंदविले गेले आहे, तर कोकणच्या काही भागात तापमान ३०अंशाच्या वर आहे.
रविवारी, ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर सारख्या ठिकाणी कमाल तापमान ४७. ५ अंश व ४७. ४ अंश एवढे नोंदविले गेले. नागपूर येथे कमाल तापमान ४४ अंश, वर्धा ४६. २, परभणी ४५. ८, मालेगाव ४५,अकोला ४४. ६, गोंदिया ४४. ३ अंश अशी नोंद झाली. त्याचवेळी रत्नागिरी येथे कमाल तापमान ३३. ६ अंश व मुबंई येथे ३५. ४ अंश आहे.
स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसर सध्या तरी राज्याचे तापमान कमी होऊ शकत नाही उलट कमाल तापमान किंचित वाढू शकते कारण शुष्क व उष्ण वारे सिंध व बलुचिस्तान ह्या उष्ण भागाकडून महाराष्ट्र कडे वाहत आहे.
[yuzo_related]
परंतु विदर्भाच्या पूर्व भागात ढगांच्या गडगडाटासह हलकासा पाऊस होऊ शकतो . गोंदिया, चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि नागपूर ह्या जिल्ह्यामध्ये पुढील २४ ते ४८तासात ढगांच्या गडगडाटासह तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण येथे हवामान, अंशतः ढगाळ व कोरडे राहील. दोन ते तीन दिवस झाल्यानंतर तापमान अजून वाढू शकते.
हवामानाचा महाराष्ट्र कृषी विभागावर होणारा परीणाम पाहू;
पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवानी पिकांना पानी देणे, खत देणे टाळावे. जिथे कमाल तापमान जास्त आहे अश्या ठिकाणी आले, हळद, डाळी आणि भाजीपाला पिकांना पानी द्यावे. काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावी.
दक्षिण कोकण मधील शेतक-यांनी खरीफ भात आणि नाचणी पेरणी ह्यासाठी वाफ्यांच्या तयारी सुरू करावी.केळीचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी लपेटून सावलीत ठेवावी. वारे जास्ती येऊ शकतात म्हणून योग्य ती खबरदारी घेऊन केळीचे संरक्षण करावे
Image Credit: pinsdaddy
येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.