Skymet weather

[Marathi] १३६० मि.मी.सह मुंबईत जुलैमधील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात जास्त पाऊस

July 29, 2019 3:01 PM |

Mumbai rains 2019

जुलै महिना हा मुंबई शहरासाठी पावसाळी ठरला आणि तीन अंकी पावसाने यावेळी तीनदा हजेरी लावली. शिवाय, जुलैच्या पहिल्या काही दिवसांतच मुंबईने जुलैच्या सरासरी (८४०.७) मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदवला.

गेल्या आठवड्याच्या शेवटीही मुंबई पावसाने केवळ २४ तासांत तब्बल २१९ मिलिमीटर पावसाची नोंद केली. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले. खरं तर, मुसळधार पावसामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापुरात रात्रभर अडकली आणि एनडीआरएफ व भारतीय नौदलने अडकलेल्या ७०० वाचविण्यात मदत केली.

तथापि काल पासून पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि सांता क्रूझ मध्ये केवळ ०.५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

जुलैच्या पावसाच्या आकडेवारीबद्दल सांगायचे तर आतापर्यंत म्हणजेच २९ जुलै पर्यंत सांताक्रूझ वेधशाळेमध्ये १३५९.७ मिमी पाऊस पडला आहे जो सामान्यपेक्षा ५०० मिमी जास्त आहे. खरं तर, जुलै २०१४ नंतर (१४६८.५ मिलीमीटर) नोंदवला गेलेला हा दुसरा चार अंकी सर्वात जास्त पाऊस आहे.

आता, पुढील काही दिवस मध्यम पाऊस सुरु राहील आणि अंदाजे २०-३० मिमी पाऊस पडेल आणि जोरदार सरी पडण्याची शक्यता नसल्यामुळे शहर सर्वकाळ विक्रम ओलांडू शकेल असे वाटत नाही.

प्रतिमा क्रेडीट: स्क्रोल.इन

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try