[Marathi] १०९ मिमी पावसासह मुंबईने नोव्हेंबर महिन्यातील पावसाचा ४० वर्षांचा विक्रम मोडला

November 8, 2019 7:56 PM | Skymet Weather Team

हे वर्ष मुंबईकरीता पावसाच्या बाबतीतील विक्रम मोडणारे वर्ष राहिले असून दररोज नवे विक्रम घडत आहे. शहरात जून महिन्यात पावसाने हजेरी लावली होती आणि एक महिन्यापूर्वी नैऋत्य मान्सून परतल्यानंतरही अजून देखील पाऊस थांबलेला नाही.

ऑक्टोबरमध्ये शहरात पावसाने हजेरी लावली होती व जनमाणसाचा असा विश्वास झाला होता कि मुंबईतला पाऊस ओसरला पण नोव्हेंबरची सुरुवात जोरदार पावसाने झाली.

पहिल्या दिवशी शहरात ४६ मि.मी. पाऊस पडला. त्यानंतर कालपासून आज दुपारी अडीच वाजेपर्यंत तब्बल ६३ मिमी एवढा पाऊस झाला. अशाप्रकारे नोव्हेंबर महिन्यात मुंबईत १०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचे श्रेय चक्रीवादळ माहा ला देण्यात येते, जरी हे चक्रीवादळ अशक्त झाले असले तरी कोकण किनारपट्टीच्या सान्निध्यात आहे.

नोव्हेंबर महिन्यातील पावसाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यातील पावसाची सरासरी फक्त ९.९ मिमी इतकी आहे. दरम्यान, ७७.५ मिमी चा दशकापूर्वी जुना विक्रम २००९ मध्ये नोंदवला गेला होता. मुंबईकरीता सर्वकालीन नोव्हेंबरमधील पाऊस १०१.३ मिमी इतका होता, जो १९७९ साली नोंदला गेला होता.

अशाप्रकारे, अवघ्या आठच दिवसांत, मुंबईतील पावसाने नोव्हेंबरचा ४० वर्ष जुना विक्रम अखेर मोडीत काढला आहे.

 Image Credits – The Hindu

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES