स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबईत पावसाचा जोर वाढलेला आहे. मागील २४ तासात कुलाबा वेधशाळेत ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामानतज्ञांनी आधीच वर्तविल्यानुसार आजपासून मुंबईत मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे आणि दिवस जसजसा पुढे सरकेल तसा पावसाचा जोर देखील वाढण्याची अपेक्षा आहे.२९ जून पर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सक्रिय झालेला मान्सून आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर असलेली ट्रफ व बंगालच्या पूर्व-मध्य खाडीवर उपस्थित चक्रवाती प्रणालीला या पावसाचे श्रेय दिले जाऊ शकते.
खरं तर, मान्सूनचा पाऊस आता काही काळ वास्तव्य करणार आहे. साधारण ३० जूनच्या आसपास पावसाचा जोर कमी होईल परंतु पाऊस कमी अधिक प्रमाणात ३-४ जुलै पर्यंत सुरु राहील. त्यानंतर तयार होण्याची शक्यता असलेले बंगालच्या पूर्व-मध्य खाडीवरील कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रकडे वळल्यामुळे पावसाळी गतिविधींमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा मुंबई आणि जवळपासच्या भागात काही मध्यम ते जोरदार सरींची अपेक्षा करू शकतो.
मान्सूनच्या आगमनापर्यंत मुंबईत पावसाचे दुर्भिक्ष होते. पावसाला सुरुवात झाल्यापासून जून महिन्यात आतापर्यंत कुलाबा वेधशाळेने १७८. ८ मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेने १८३. ६ मिमी पावसाची नोंद केली आहे. पुढील तीन दिवसांच्या कालावधीत हवामानतज्ञांच्या मते २०० मिमी पावसाची अपेक्षा असूनही मुंबईला जून महिन्यातील ४९३ मिमी पावसाचे लक्ष्य गाठण्यात यश मिळेल यात थोडी शंका आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे