[Marathi] जुलै महिन्यात मुंबईतील पाऊस ऐतिहासिक नोंद करण्यात थोडक्यात राहणार, एकूण १४६३मिमी पाऊस

July 31, 2019 7:20 PM | Skymet Weather Team

पावसाच्या दृष्टीने मुंबईसाठी जुलै महिना अत्यंत चांगला ठरला आहे. जून महिनादेखील पावसाच्या दृष्टीने चांगला ठरला, या महिन्यात सामान्य ४९३.१मिमी

पावसाच्या तुलनेत ५१७ मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय जुलै मधील पहिल्याच दोन दिवसात शहरात जवळपास ५०० मिमी इतका प्रचंड पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे सखल भागत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

खरं तर, मुंबईने मासिक पावसाचे लक्ष्य महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच गाठले होते. त्यानंतर, दहा दिवसांपेक्षा जास्त काळ विश्रांती घेतल्यानंतर

मुसळधार पावसाने मुंबईत पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. गेल्या आठवड्याच्या अखेरीस २१९ मिमी पावसाची नोंद झाली.

गेल्या काही दिवसांत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला आहे,आज पावसाच्या तीव्रतेत किंचित वाढ झाली असून ६ तासांच्या कालावधीत शहरात ५२ मिमी पावसाची नोंद झाली.

यासह, मुंबईमध्ये या हंगामात १४५१ मिमी इतक्या प्रचंड पावसाची नोंद झाली असून हा जुलै महिना मुंबईसाठी सर्वाधिक पावसाचा दुसऱ्या क्रमांकाचा महिना

ठरला आहे. मुंबईमध्ये जुलै मधील सर्वाधिक पावसाची  नोंद २०१४ साली १४६८.५ मिमी इतकी झाली होती.

तथापि, जुलै मधील सर्वाधिक पावसाचा विक्रम मोडण्यास मुंबईला फारच थोड्या पावसाची गरज आहे. आतापर्यंत मुंबईत १४६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे २०१९ सालचा जुलै महिना मुंबईसाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पावसाचा महिना ठरला आहे.

हवामानतज्ञांनुसार पुढील काही दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असून किमान काही दिवस तरी जोरदार पावसाची शक्यता नाही.

OTHER LATEST STORIES