गेल्या काही दिवसापासून मुंबईत जोरदार पाऊस झालेला आहे. खरं तर, शहरात दिवसाला १०० मिमी पाऊस पडला आहे असे म्हणणे वावगे नाही. याशिवाय, महिन्याच्या पहिल्या दिवशीच ३७५ मिमी इतका जोरदार पाऊस झाला आहे.
गेल्या २४ तासांत मुंबई शहरात जोरदार पाऊस झाला असून सांताक्रूज वेधशाळेत ५० मिमी पावसाची तर कुलाबा येथे ७४ मिमी पावसाची नोंद झाली.
जुलैच्या पहिल्या दहा दिवसात जोरदार पाऊस झाल्यामुळे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात पावसाने मुंबईत सहजपणे जुलै महिन्याची सरासरी पार केली आहे.आजपर्यंत जुलैच्या सरासरी ८६५.७ मिमी पावसाच्या तुलनेत ८६५ मिमी पावसाची नोंद झाली. खरं तर, गेल्या दहा वर्षांतील पावसाच्या नोंदी पाहिल्यास, जुलै महिन्यात बऱ्याच वर्षात चार अंकी पाऊस पडला असून २०१४ मध्ये सर्वाधिक १४६८.५ मिमी पावसाची नोंद झाली होती.
आता, पुढील दिवसांबद्दल बोलायचे तर मुंबईतील पावसाचा जोर आता कमी झालेला दिसून येईल याचे प्रमुख कारण मान्सून ट्रफ हिमालयाच्या पायथ्याकडे सरकली आहे. संपूर्ण देशाकरिता सांगायचे तर मान्सूनच्या पावसात खंड पडेल, मुंबईत कमीतकमी एक आठवड्यापर्यंत पाऊस राहील मात्र प्रमाण आधीच्या तुलनेने खूप कमी असेल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे