[Marathi] मुंबईकरांची उकाड्यापासून तूर्तास सुटका नाही

May 23, 2019 8:53 AM | Skymet Weather Team

मुंबई शहर परिसर मागील बऱ्याच दिवसांपासून कोरडे व उष्ण हवामान अनुभवत आहे, खरे पाहता साधारण डिसेंबर महिन्यापासून मुंबईत पाऊस नोंदवण्यात आलेला नाही.

सध्या मुंबईत हवामान कोरडे असून आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. दुपारी गरम आणि आर्द्र वाऱ्यामुळे कामानिमित्त ऑफिस किंवा घराबाहेर निघणे असह्य होत आहे.

तथापि, थंड हवेच्या झुळकेमुळे संध्यकाळी मुंबईत हवामान आल्हाददायक आहे.

Also read in English: No relief from sweltering weather in Mumbai for some more time

सध्या वारे उत्तरेकडून येत आहे आणि त्यामुळे पाऊस पडण्याच्या दृष्टीने सांगायचे तर वाऱ्यांच्या दिशेत बदल होणे महत्वाचे आहे.

राज्यातील लगतच्या भागांमध्ये या आठवड्याच्या शेवटी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मुंबईत अंशत: ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून काही भागात तुरळक सरी होण्याची अपेक्षा आहे. पाऊस पडला तरी फारच कमी कालावधीसाठी असेल.

मुंबईकरांना सध्या तरी चांगल्या पावसासाठी काही काळ वाट पहावी लागेल असेच म्हणावे लागेल. कारण पूर्व मान्सून पावसाच्या सुरूवात होण्यास जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोणतेही लक्षणीय बदल अपेक्षित नाहीत.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES