जुलैच्या पहिल्या काही दिवसातच मुंबई शहरात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. जुलैच्या पहिल्या दिवशीच तब्बल ३७५ मिमी पाऊस झाल्यामुळे सखल भाग जलमय झाले होते, हवाई सेवा देखील विस्कळीत झाली होती यासह इतर विविध अडचणींना मुंबईकरांना तोंड द्यावे लागले. त्यानंतरही पाऊस सुरूच होता त्यातही काही दिवस जोरदार तर काही दिवस हलका ते मध्यम पाऊस सुरु होता.
काल सकाळी पुन्हा मुंबई शहरात मुसळधार पाऊस झाला, २४ तासांच्या कालावधीत मुंबईत १३० मिमी पावसाची नोंद झाली असून सकाळच्या फक्त तीन तासांतच १०८ मिमी पाऊस नोंदला गेला. या हिन्यात एकूण ८०८ मि.मी. इतका पाऊस झाला आहे जो जुलै महिन्याच्या सरासरी ८४०.७ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ ३३ मिमी कमी आहे आणि हा सगळा पाऊस या महिन्याच्या फक्त ९ दिवसांत नोंदला गेला आहे.
दरम्यान शहरात दुसऱ्या दिवशीही काही ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यानंतर मात्र ११ जुलैच्या आसपास पावसाचा जोर कमी होऊन, साधारण २०-३० मिमी पर्यंत केवळ हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
तथापि अरबी समुद्रात एक विपरीत चक्रवाती प्रणाली निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे विषुवृत्तीय प्रवाह कमकुवत होईल आणि वायव्येकडून वारे वाहतील आणि परिणामी मुंबईमध्ये पावसाचं जोर कमी होण्याची शक्यता आहे.
मात्र काही दिवसात मुंबईत पाऊस जुलै महिन्याची सरासरी गाठेल यात काही शंका नाही.
मागील दहा वर्षातील सांख्यिकीचा विचार केला तर, मुंबईत दोन वर्षी २०१२ आणि २०१५ मध्ये पाऊस जुलै महिन्याची सरासरी गाठू शकला नाही. दुसरीकडे, शहरात जुलैमध्ये चार अंकी पावसाची नोंद किमान चार वेळा केली गेली. यावरून असे दिसते की पावसाच्या बाबतीत जुलै महिना मुंबईकरांना निराश करत नाही आणि जवळजवळ नेहमीच पाऊस सरासरीपेक्षा अधिक असतो.
Image Credit: NDTV
Any information taken from here should be credited to skymetweather.com