मुंबई आणि महाराष्ट्रातील बर्याच भागांतगणेश चतुर्थीच्यासणाची सुरुवात पावसाने झाली. पावसामुळे राज्यातील बहुतांश भागातील हवामान सुखद झाले आहे आणि दिवसभर अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासात कोकण आणि गोवा येथे गडगडाटासह चांगला पाऊस झाला असून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडला आहे.
स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत रविवार सकाळी साडेआठपासून हर्णेमध्ये ९१ मिमी, डहाणूमध्ये ५१ मिमी,वेंगुर्लामध्ये ४८ मिमी,ब्रह्मपुरीमध्ये ४५ मिमी आणि रत्नागिरीमध्ये ४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
स्कायमेट हवामान तज्ज्ञांनी पुढील दोन दिवस विदर्भातील काही भागात एक ते दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस आणि मराठवाड्यात मध्यम सरी बरसण्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, कोकण आणि गोवा येथे मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील. या कालावधीतमुंबईतएक किंवा दोन मध्यम सरींची शक्यता आहे, परंतु मुसळधार पावसाची कोणतीही शक्यता नाही.
मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि नाशिकसारख्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील. पुढील दोन ते तीन दिवस हवामान ढगाळ व आरामदायक राहील.
या सर्व हवामान परिस्थितीचे श्रेय गुजरातमधील चक्रवाती परिभ्रमणाला दिले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र किनारपट्टीवरील कमकुवत ट्रफ रेषेमुळे मान्सून ची सक्रिय अवस्था आहे.
स्कायमेटच्या आकडेवारीनुसार १ जून ते १ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील पावसाची २१% कमतरता वगळता महाराष्ट्रातील अन्य सर्व हवामान विभागांमध्ये पावसाचे आधिक्य आहे.
Image Credits – Hindustan times
Any information taken from here should be credited to Skymet Weather