मुंबईसाठी जुलै हा सर्वाधिक पावसाचा महिना आहे आणि जुलै महिन्यातील मान्सूनचे प्रदर्शन पाहता पावसाच्या वाट्याला क्वचितच अपयश आले. खरं तर, दुष्काळ असो किंवा नसो, अल-निनो असो किंवा नसो, मुंबईकरांना पावसाने क्वचितच निराश केले आहे आणि बहुतांश वेळेस नेहमीच जुलैत पावसाचे प्रमाण जास्त राहिले आहे. मागील दहा पैकी दोन वर्षे वगळता आठ वर्षात जुलैमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे.
गेल्या पाच वर्षांच्या बाबतीत बोलायचे तर जुलै २०१४ मध्ये सर्वाधिक १४६८.५ मिमी पाऊस नोंदला गेला होता. तथापि, दुष्काळी वर्ष २०१५ मध्ये फक्त ३६५ मिमी इतका कमी पाऊस झाला होता.
या वर्षाच्या जुलै महिन्यात फक्त १० दिवसांत मुंबईच्या पावसाने महिन्याची सरासरी पार केली असून ८६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे सलग चौथे वर्ष आहे ज्यात जुलै महिन्यात पाऊस सामान्यपेक्षा अधिक राहिला. साल २०१८ मध्ये ८६८ मिलीमीटर पाऊस झाला होता तर २०१९ हे वर्ष सर्वात वेगवान असल्याचे दिसून आले आहे ज्यात ११ जुलैपर्यंतच पावसाने महिन्याची सरासरी पार केली आहे.
दरम्यान २०१६ आणि २०१७ हे सर्वात संथ वर्ष होते, ज्यामध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवशी सरासरी पावसाची पूर्तता केली गेली. तर २०१४ मध्ये १६ जुलै ला पावसाने महिन्याची सरासरी गाठली होती.
गेल्या पाच वर्षांत २४ तासांमध्ये सर्वाधिक तीन-अंकी पाऊस २०१८ मध्ये ६ वेळेस झाला, याउलट २०१५ आणि २०१७ मध्ये तीन अंकी पाऊस झाला नाही तर २०१६ मध्ये १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस दोन वेळेस झाला होता आणि २०१४ मध्ये ५ दिवस तीन अंकी पाऊस झाला.
आता, मात्र मुंबई पावसाळी गतिविधी संथ होतील आणि जवळपास एक आठवडा तरी शहरात मोठ्या पावसाची अपेक्षा नाही.
प्रतिमा क्रेडीट: हिंदुस्तान टाइम्स
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे