मागील चोवीस तासांच्या कालावधीत गोंदियामध्ये २०8 मिमी, तर वेंगुर्ला येथे १५९ मिमी, महाबळेश्वर १४७ मिमी, डहाणू १४६ मिमी, अलिबाग १२७ मिमी आणि मुंबईत ११९ मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या २४ तासात सक्रिय मान्सूनच्या लाटेमुळे कोकण आणि गोव्यासह विदर्भातील बर्याच भागात जोरदार ते अति मुसळधार सरी कोसळल्या. दरम्यान, याकाळात मध्य महाराष्ट्रात गडगडाटी हलका ते मध्यम पाऊस नोंदला गेला. परंतु, ओलावा नसल्यामुळे मराठवाडा विभागात मात्र वातावरण जवळपास कोरडे व उबदार राहिले.
या चांगल्या पावसाचे श्रेय दक्षिण गुजरात ते केरळ पर्यंत किनारपट्टीलगत विस्तारलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला दिले जाऊ शकते. शिवाय ओडिशा प्रदेशातील कमी-दाबाचे क्षेत्र हळूहळू पश्चिम / वायव्य दिशेने सरकत आहे.
ही प्रणाली आणखी काही काळ कायम राहण्याची अपेक्षा असल्याने कोकण आणि गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बर्याच भागात पुढील ४८ तासांत मध्यम सरी सुरूच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या २४ ते ३६ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर, हि प्रणाली कमकुवत होईल व पावसाळी गतिविधींमध्ये लक्षणीय घट होईल. या संपूर्ण काळात, पुरेसा ओलावा नसल्याने मराठवाड्यात मात्र कोरडे व उबदार हवामान राहील.
प्रामुख्याने मुंबई, ठाणे, कुलाबा, अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, महाबळेश्वर, नागपूर, गोंदिया, अकोला, अमरावती इत्यादी ठिकाणी मध्यम तर डहाणू, जळगाव आणि नाशिक मध्ये काही ठिकाणी आणखी ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान १ जून ते ७ सप्टेंबर दरम्यानच्या पावसाच्या आकडेवारीनुसार सातत्याने चांगला पाऊस झाल्यामुळे कोकण आणि गोवा येथे ४६ टक्के, तर विदर्भात ३ टक्के आणि मध्य महाराष्ट्रात ५३ टक्के पावसाचे आधिक्य आहे. याउलट, चांगला पाऊस नसतानाही मराठवाड्यात ७ सप्टेंबरपर्यंत पावसाची कमतरता १८ टक्के आहे.
Image Credits – AccuWeather
Any information taken from here should be credited to Skymet Weather