[Marathi] वेंगुर्ला, रत्नागिरी मध्ये मान्सून पाऊस सुरूच राहणार; मुंबई व पुणे ला हलका मान्सून पाऊस

June 12, 2018 3:42 PM | Skymet Weather Team

मौसमी पाऊस महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्व भागात बरसला आहे,अजूनही तो राहिलेल्या ठिकाणी होत आहे . आजच्या दिवसाची कालच्या दिवसाच्या पावसाशी तुलना केली तर आदीच्या दिवसाची पावसाची तीव्रता कमी येत आहे.

हा कमी पाऊस होण्याचे कारण म्हणजे कमी दाबाच्या पत्त्यामुळे निर्माण झालेले वारे कोकण कडून केरळ किनारपट्टीकडे वाहत आहेत . सध्या हे वारे दक्षिणेला वळून गोवाकडून केरळाकडे जात आहे . या बदलामुळे उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात पाऊस कमी होत आहे तर दक्षिण कोकण मध्ये पाऊस वाढत आहे.

सोमवारी सकाळी ८. ३० पासून गेल्या २४ तासात, वेंगुर्ला येथे २९ मिमी , महाबळेश्वर२० मिमी ,ब्रह्मपुरी ११ मिमी, वाशिम ६ मिमी, चंद्रपूर ६ मिमी, माथेरान ५ मिमी, गोंदिया ४ मिमी, अलिबाग १ मिमी, मुंबई १ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

[yuzo_related]

पुढील २४ तासात विदर्भामध्ये जोरात पाऊस होण्याची शक्यता आहे तर कोकणामध्ये मध्यम ते हलकासा पाऊस होऊ शकतो. तथापि, दक्षिण कोकण विभाग जसे रत्नागिरी आणि वेंगुर्ला येथे पावसाची तीव्रता जास्त असू शकते . शिवाय,पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर विदर्भामध्ये पाऊस कमी होईल . तथापि, कोकण मध्ये हलकासा पाऊस सुरु राहील ,विदर्भ आणि मराठवाडयाचे कमाल तापमान २४ तासानंतर वाढु शकते.

हवामानाचा कृषी विभागावर होणारा परीणाम पाहू;

पिक काढणी झाल्यानंतर जमिनीची खोल नांगरणी करून घ्यावी . शेतकरी बंधूनी खते ,बियाणे यांची तयारी करून ठेवावी . वाटाणा ची पेरणी या आठवड्यामध्ये केली जाऊ शकते . कापसाची लावणी करण्यापूर्वी त्याच्या बिया बुरशीनाशकाचा वापर करूनच वापराव्यात .

Image Credit: YouTube             

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे

 

 

 

OTHER LATEST STORIES