[Marathi] कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथे पावसाने दडी मारली असून महाराष्ट्रातील धरणे भरली आहेत

August 14, 2019 10:30 AM | Skymet Weather Team

गेल्या अनेक दिवसांपासून मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांतही पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे.

कमी दाबाचा पट्टा पश्चिम / उत्तर पश्चिम दिशेने जाऊ लागला आहे, त्याचा परिणामस्वरूप पश्चिम किनारपट्टीवर पाऊस कमी होईल. तथापि, येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोवा येथे काही जोरदार सरींची शक्यता आहे.

महाबळेश्वर आणि कोल्हापूरच्या घाटांसारख्या ठिकाणी एक किंवा दोन मुसळधार सरींची शक्यता आहे, तर सांगली व सातारा येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, हलक्या ते मध्यम सरी पुणे शहरावर बरसतील.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या मते मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे पाऊस काही दिवसांपूर्वी सारखा तीव्र होणार नाही. तथापि, कृष्णा खोऱ्यांतील धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, येत्या पावसामुळे पूर निर्माण होऊ शकेल आणि परिस्थिती आणखी बिकट होईल. जरी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नसली तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

उद्या, पश्चिम किनारपट्टी, विशेषत: दक्षिण कोकण आणि गोवा तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाळी गतिविधींमध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

Image Credits – The Financial Express

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES