[Marathi] पुढील २४ ते ४८ तासांत सांगली, सातारा, कोल्हापूर, महाबळेश्वर आणि पुणे येथे पावसाची शक्यता

October 7, 2019 3:15 PM | Skymet Weather Team

गेल्या दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात पावसाळी गतिविधी सुरू आहेत. गेल्या २४ तासांत दोन्ही विभागात काही ठिकाणी एक दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस पडला.

स्कायमेटकडील उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार, २४ तासांत नाशिकमध्ये ४१ मिमी, परभणी २९ मिमी, महाबळेश्वर आणि पुणे येथे प्रत्येकी १४ मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, कोकण आणि गोवा येथे पावसाळी गतिविधी तुलनेने कमी होत्या, तर मुंबईत हवामान कोरडे व उबदार राहिले.

स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी येत्या २४ ते ४८ तासांत मुंबई व उपनगरामध्ये तुरळक सरींचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान याच काळात मध्य महाराष्ट्रात काही चांगल्या सरींची शक्यता आहे.

सांगली, सातारा, कोल्हापूर, आणि महाबळेश्वर येथे एक किंवा दोन मुसळधार सरींसह मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र पुण्यात पावसाळी गतिविधी तुलनेने कमी असतील.

दरम्यान, विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यातील सोलापूर, परभणी, नांदेड आणि बीड येथे येत्या २४ तासांत एक किंवा दोन दमदार सरींची शक्यता आहे.

त्यानंतर मात्र विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होईल, तथापि दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ११ किंवा १२ ऑक्टोबरपर्यंत विखुरलेला पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे.

Image Credits – The Indian Express 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES