नागपूर, चंद्रपूर, परभणी, नांदेड, मुंबई, पुणे, रत्नागिरी, अलिबाग येथे पुढील २४ तासांत विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे.
बुलडाणासारख्या विदर्भाच्या पश्चिम जिल्ह्यांत गुरुवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून गेल्या २४ तासांत ३८ मि.मी. पाऊस झाला. त्याचप्रमाणे परभणी आणि औरंगाबादसारख्या मराठवाड्याच्या काही भागांत काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, कोकण आणि गोव्याच्या काही भागांत हलक्या ते मध्यम पावसासह काही जोरदार सरींची नोंद झाली, त्याच काळात कुलाबामध्ये तब्बल ८१ मिमी पाऊस पडला.
स्कायमेट वेदरनुसार चक्रवाती परिस्थिती उत्तर मध्य महाराष्ट्रातून पुढे ईशान्य अरबी समुद्राकडे सरकली आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील बर्याच भागांत पाऊस कमी होईल. तथापि, हवामान प्रणालीच्या अवशेषमुळे पुढील २४ तासांत मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेला पाऊस पडेल.
कोकण आणि गोवा हवामान विभागात पुढील काही दिवस काही मध्यम सरींसह हलका पाऊस सुरु राहील. नागपूर, चंद्रपूर, परभणी, नांदेड, मुंबई, पुणे, रत्नागिरी, अलिबाग इत्यादी ठिकाणी आणखी २४ तास पाऊस पडेल.
२४ सेप्टेंबरच्या आसपासच पावसाचा जोर परत वाढणे अपेक्षित आहे आणि त्या काळात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील भागांत मध्यम पाऊस परतण्याची शक्यता आहे.
२५ सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोवा येथेही पाऊस वाढेल आणि २६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. या काळात विभागातील बर्याच भागांत काही मुसळधार सरींची शक्यता आहे.
Image Credits – Maharashtra today
Any information taken from here should be credited to Skymet Weather