[Marathi] अतिशय तीव्र चक्रीवादळ वायु मुंबईच्या पश्चिमेकडे जाण्याची अपेक्षा, पावसाचा जोर वाढणार

June 12, 2019 9:35 AM | Skymet Weather Team

मुंबई शहरात पाऊस परतलेला आहे व गेल्या ४८ तासात बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. पावसामुळे तापमानात घट देखील दिसून आलेली आहे ज्यामुळे हवामान आनंददायी झाले आहेत.

होणाऱ्या पावसाचे कारण आहे चक्रीवादळ वायु, जे आता आणि अतिशय तीव्र चक्रीवादळ मध्ये रूपांतरित झाले आहेत. बनलेल्या हवामान प्रणालीमुळे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात आज पण पावसाची शक्यता आहे.

याशिवाय, मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात सुद्धा आज पावसाची शक्यता आहे ज्यामुळे रहिवाशांना कोरड्या हवामानापासून सुटका मिळेल. आज, दुपार पर्यंत, अतिशय तीव्र चक्रीवादळ वायु समुद्रकिनार्यापासून २६० किलोमीटर दूर मुंबईच्या पश्चिमेकडे जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पावसाचा जोर संपूर्ण शहरात वाढेल. दरम्यान, ६० किंलोमीटरच्या वेगाने वारे देखील वाहतील.

अशा प्रकारे, मुंबई शहरात पावसासह वादळी दुपार अनुभवण्यात येईल.समुद्रातील परिस्थिती खराब असल्यामुळे मच्छिमारांना सल्ला देण्यात येत आहे कि त्याने समुद्रात न जावे. दरम्यान, समुद्रातील लाटा ८ ते १० फूट उंचीवर जातील.

संपूर्ण महाराष्ट्र साठी वेदर अलर्ट

मुंबई, पालघर, पुणे, रायगढ़, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे मध्ये येणाऱ्या ३६ ते ४८ तासात, १०० ते १२० किंलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील. समुद्रातील परिस्थिती अतिशय खराब राहण्याची अपेक्षा आहे.

अपेक्षित पावसानंतर, पावसाचा जोर १३ व १४ जून रोजी कमी होणे अपेक्षित आहेत. त्यांनतर पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढेल आणि मुंबईत मॉन्सूनचे आगमन होण्याची अपेक्षा आहे.

पावसामुळे हवामान आनंदायी होईल व तापमानात देखील लक्षणीय घट दिसून येईल. अशा प्रकारे, असे म्हणू शकतो की मुंबईकरांना मॉन्सूनच्या आगमनाची फार काळ आता प्रतीक्षा करावी लागणार नाही.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES