[Marathi] धर्मशाला, बद्रिनाथ, केदारनाथ आणि मसूरीत आणखी बर्फवृष्टीची शक्यता

January 29, 2020 3:11 PM | Skymet Weather Team

या हिवाळ्याच्या हंगामात मागील वर्षांच्या तुलनेत पश्चिमी विक्षोभांची वारंवारता जास्त आहे. जानेवारी महिन्यातच चार अतिशय सक्रिय पश्चिमी विक्षोभ (आतापर्यंत) पाहिले गेले आहेत ज्यांनी उत्तरेकडील डोंगररांगांवर बर्‍यापैकी पाऊस आणि बर्फवृष्टी केली आहे.

सध्याच्या हवामान प्रणालीमुळे जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गेल्या ४८ तासांत बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी झाली आहे.

दरम्यान हि प्रणाली हळू हळू दूर सरकण्यास सुरूवात झाली असली तरी उत्तर भारतातील सर्व डोंगराळ राज्यात आज रात्रीपर्यंत बर्फवृष्टी होणे अपेक्षित आहे. कुल्लू, मनाली, धर्मशाला, बद्रीनाथ, केदारनाथ, मसूरी तसेच धर्मशाळात आणखी २४ तास मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. शिवाय उत्तरेकडून वारे वाहत असून तापमानात लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे. किमान तापमान, विशेषत: पुढील काही दिवस सामान्यपेक्षा खाली स्थिरावण्याची शक्यता आहे.

उद्या, डोंगररांगांवर बर्‍याच भागांत हवामान विषयक गतिविधींमध्ये घट होण्याची शक्यता आहे. तथापि, उत्तराखंडमध्ये आणखी काही काळ हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

यानंतर किमान एक आठवडा तरी उत्तरेकडील डोंगररांगांवर कोणताही मजबूत पश्चिमी विक्षोभ धडकण्याची शक्यता नाही. दरम्यान ४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमध्ये विखुरलेला पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, परंतु इतर राज्यांत कोणतीही लक्षणीय गतिविधी अपेक्षित नाही.

Image Credits – YouTube 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES