[Marathi] राजस्थान मध्ये येणाऱ्या दिवसात पूर्व मॉन्सूनचा पाऊस सुरु राहणे अपेक्षित

May 20, 2019 10:08 AM | Skymet Weather Team

मे महिन्याच्या सुरुवाती पासूनच, राजस्थान राज्यात धुळीचा वादळासह पावसाची नोंद करण्यात येत आहे. ह्याचे कारण आहे, राजस्थान मधील भागात बनलेली चक्रवाती परिस्थिती.

खरं तर, काल, राजस्थान मधील दक्षिण भाग जसे, बारमेर, जालोर, आणि जैसलमेर मध्ये धुळीचा वादळासह हलक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

सध्या, एक नवीन पश्चिमी विक्षोभ पश्चिम हिमालय जवळ पोहोचला आहे. त्याच्या, प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती राजस्थानच्या भागांमध्ये लवकरच विकसित होईल, ज्यामुळे आम्ही असे म्हणू शकतो की उद्या पासून राजस्थान मध्ये पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, राज्यातील पश्चिम व उत्तर भाग जसे, श्री गंगानगर, हनुमानगढ, अलवर, सीकर, चुरु, टोंक, जयपूर आणि अजमेर येथे पावसाची शक्यता आहे. पुढे, येणाऱ्या दोन ते तीन दिवसात, पावसाची तीव्रता वाढणार व दक्षिण राजस्थान मधील काही अजून भाग देखील पाऊस अनुभवतील.

Also read in English: Pre-Monsoon rains to continue in Rajasthan, intensity to increase in coming days

होणाऱ्या पावसामुळे, तापमानात घट दिसून येईल व कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवण्या जाण्याची शक्यता आहे. येणाऱ्या तीन ते चार दिवस, राजस्थान मधील रहिवाशांना गरमी पासून सुटका मिळेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES