[Marathi] मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस

September 8, 2015 5:18 PM | Skymet Weather Team

मान्सूनच्या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीला तसेच कोकण आणि गोवा सोबतच मुंबईसह रत्नागिरी येथे जोरदार पाऊस झाला. आणि दुसरीकडे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथे कमी पाऊस झाला. यंदाच्या मान्सून काळात संपूर्ण महाराष्ट्रातच कमी पाऊस झाला आहे.

दिनांक ३१ ऑगस्ट पर्यंत मराठवाडा येथे ५०% कमी पाऊस झाला असून मध्य महाराष्ट्रातही ४०% कमी पाऊस झाला आहे. तसेच विदर्भात मात्र या दोन भागांपेक्षा थोडीफार चांगली परिस्थिती आहे.कारण येथे सरासरीपेक्षा १३% कमी पाऊस झाला आहे जो कि साधारण पातळीच्या जवळपास आहे.

सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा पावसाच्या दृष्टीने चांगला ठरला आहे. तसेच पहिले ३ ते ४ दिवस फारसा पाऊस झालेला नसला तरी सध्या या भागात गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस सुरु आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात परभणी येथे ५३ मिमी, अमरावती येथे ४३ मिमी, उस्मानाबाद येथे ४० मिमी, धुळे येथे ४० मिमी, वर्धा येथे३४ मिमी, अहमदनगर आणि अकोला येथे ३० मिमी, सोलापूर येथे २३ मिमी आणि नांदेड येथे २१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीला एक चक्रवाती हवेचे अभिसरनाचे क्षेत्र तयार होणार असल्याने या भागात चांगला पाऊस होईल. तसेच बंगालच्या उपसागरात तयार होणारी मान्सूनची प्रणाली हि जमिनीकडे सरकत असल्याने या भागात चांगला पाऊस होणे अपेक्षित आहे.

सध्या सर्वात जास्त पावसाची कमतरता असलेले मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील या भागात येता आठवडाभर चांगला पाऊस होईल आणि त्यामुळे पावसाची जी उणीव निर्माण झालेली आहे ती भरून निघण्यास थोडीफार मदत होईल. आता होणारा पाऊस हा सध्या असलेल्या पिकांसाठी हितकारक आहे तसेच पुढच्या पेरणी साठीही चांगला ठरणार आहे.

 

Image Credit: umagz.in

 

OTHER LATEST STORIES