[Marathi] मुंबईत अजून मुसळधार पावसाची शक्यता

June 13, 2015 4:04 PM | Skymet Weather Team

मुंबईत मान्सूनने थोड्या उशीर का होईना पण जोरदार पावसांच्या सरींनी आगमन केले आहे. कालच म्हणजे १२ जून रोजी मान्सून मुंबईत येवून धडकला. कालच्या दिवस भरात ८२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सध्याचे वातावरण देखील मध्यम ते मुसळधार पावसाला पोषक आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसात मध्यम ते मुसळधार पावसाची श्यक्यता आहे. आता सुध्दा मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. याची तीव्रता हळूहळू वाढू शकते. कारण समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हा खूपच सक्रीय झाला आहे.

स्कायमेटकडे असलेल्या नोंदींनुसार मुंबईतील पावसाची जून महिन्याची सरासरी हि ५२३ मिमी असते. यंदा आतापर्यंत फक्त १०० मिमी पावसाची नोंद झालेली असली तरी हे फारसे काळजीचे कारण नाही. कारण येत्या २ ते ३ दिवसात भरपूर प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असल्याने जून मधील पाऊस हा मासिक सरासरी नक्कीच गाठेल.

जून महिन्याच्या सरासरीनुसार मुंबईत १५ दिवस २.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. जसजसे मान्सून सक्रीय होत जाईल तसतसे मुंबईत जुलै महिन्यात सरासरीनुसार २३ दिवस पाऊस होत असतो. म्हणजेच जुलै महिन्यात मुंबईत भरपूर पाऊस होतो. त्यामुळे मान्सूनच्या काळात रस्त्यांवर पाणी साठणे आणि वाहतुकीची कोंडी होणे हे नेहमीचेच असते.

गेल्या १० वर्षातील जून मधील पावसाच्या नोंदींचा अभ्यास केला तर असे दिसून येते कि मुंबईत २०१३ मध्ये सर्वात जास्त म्हणजे १०२९.८ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे आणि २४ जून २००७ रोजी एका दिवसात म्हणजेच २४ तासात सर्वात जास्त (२०९.६ मिमी) पावसाची नोंद झाली होती.

 

Image Credit: mumbaipaused.blogspot.com

OTHER LATEST STORIES