[Marathi] सक्रिय मान्सूनमुळे नागपूर, डहाणू आणि नाशिक येथे चांगल्या पावसाची शक्यता

September 26, 2019 4:59 PM|

Maharashtra weather today

गेल्या २४ तासात मान्सून महाराष्ट्रातील बर्‍याच भागात सक्रिय राहिला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाळी गतिविधींची नोंद केली गेली.

विदर्भ,उत्तर महाराष्ट्र तर मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपावसाने हजेरी लावली, तर कोकण आणि गोवा येथे हलका ते मध्यम पाऊस पडला.

पुणे शहरात २१ तासांच्या कालावधीत मुसळधार ९० मिमी पाऊस नोंदला गेला असून जागोजागी पाणी साचण्याची समस्या उद्भवली आहे. दरम्यान, मुंबईत तुलनेने हलक्या पावसाची नोंद झाली.

इतर शहरांच्या पावसाच्या आकडेवारीबद्दल सांगायचे तर २१ तासांच्या कालावधीत नागपूरमध्ये ४८ मिमी, डहाणूत ४७ मिमी, वाशिम येथे ४४ मिमी आणि नाशिकमध्ये ३६ मिमी पावसाची नोंद झाली.

सद्यस्थितीत महाराष्ट्रातील किनारपट्टीवर चक्रवाती परिभ्रमण असून दक्षिण गुजरातपासून या प्रणालीपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे.

या प्रणालींच्या प्रभावामुळे स्कायमेटमधील हवामानशास्त्रज्ञांनी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. ह्याच प्रणालींच्या प्रभावामुळे कोकण, गोवा आणि मराठवाड्यात पुढील २४ तासांत विखुरलेला पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पुढील २४ तासांत जळगाव, अकोला, नागपूर, नाशिक, डहाणू आणि गोंदिया येथे गडगडाटासह चांगल्या पावसाची शक्यता आहे.

उद्यापर्यंत मुंबईत एक-दोन मध्यम सरींची शक्यताअसून त्यानंतर मात्र हवामान जवळजवळ उष्ण व दमट होईल. त्याचप्रमाणे पुण्यात देखील पावसाचा जोर तुलनेने कमी होईल. तथापि, विदर्भातील काही भागात २८ सप्टेंबरपर्यंत विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Image Credits – AccuWeather

Any information taken from here should be credited to Skymet Weather

author image