[Marathi] मान्सूनचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर, २० सप्टेंबरच्या आसपास परतीला सुरुवात

September 13, 2019 9:55 AM | Skymet Weather Team

मान्सून हा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा हंगाम असून जून महिन्यात सुरुवात होऊन सप्टेंबर परतीचा महिना म्हणून ओळखला जातो. हंगाम सुरु होण्याच्या तारखेत तफावत फार मोठी नसते परंतु परतीच्या तारखांमध्ये मोठी तफावत दिसते.

मान्सूनची परतीची अधिकृत तारीख १ सप्टेंबर आहे परंतु काही वेळेस ती दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत पोचते आणि कधीकधी त्यापलीकडेही जाते.

परतीस सुरुवात राजस्थानच्या पश्चिम भागातून होते आणि एकाच वेळी पंजाब, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरलाही व्यापते. मात्र या प्रक्रियेचा कोणताही प्रकारचा ठराविक पॅटर्न, तारीख किंवा वेग नाही.

सामान्यतः सप्टेंबरच्या उत्तरार्धात मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु होतो दरम्यान ह्या प्रवासाला १ सप्टेंबरपूर्वी कधीच सुरुवात होत नाही.

मान्सूनच्या परतीच्या प्रवासावर परिणाम करणारे घटक

मान्सून परतलेला आहे असे जाहीर करण्यासाठी बऱ्याच गोष्टी विचारात घेतल्या जातात उदा. एखाद्या भागात एकूण पाच दिवस पाऊस थांबणे. वातावरणातील खालच्या थरात प्रतिचक्रवात निर्माण होण्यासोबत आर्द्रतेच्या पातळीत घट, तापमानात वाढ आणि ढगांचे प्रमाण कमी होणे ही आणखी एक बाब आहे.

पाऊस पडण्याअभावी परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असा विचार केला जाऊ नये कारण काही भागांत पाऊस सुरु असू शकतो. मान्सूनचा माघारीचा प्रवास एक लांब प्रक्रिया असून जवळपास तीन ते चार आठवडे लागतात.

तसेच, मान्सूनची माघार फक्त १५ अंश उत्तर अक्षांश पर्यंत पोहोचते आणि तोपर्यंत ऑक्टोबर महिना मध्यात पोहोचतो व ईशान्य मान्सूनला सुरुवात होते. अशा प्रकारे, तामिळनाडू, कर्नाटक इत्यादी भागांतून माघार नाही. तथापि, भारताच्या ईशान्य भागात १५ ऑक्टोबरच्या आसपास माघारी जातो.

दिल्लीत मान्सून साधारणत: सप्टेंबरच्या अखेरीस माघार घेतो. खरं तर, काही वर्षांत तर ऑक्टोबरमध्ये माघार झाली आहे.

यंदा, दुसऱ्या पंधरवाड्यात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या मोठ्या भागांसह पश्चिम राजस्थान मधून माघार घेण्यास सुरवात होणे अपेक्षित आहे. या सर्व भागांत पाऊस कमी झाला असून नजीकच्या काळात लक्षणीय पाऊस अपेक्षित नाही.

अशाप्रकारे, तिसर्‍या आठवड्यात म्हणजेच २० सप्टेंबरच्या आसपास, मान्सून परतीस निघण्याची शक्यता आहे आणि लवकरच चार महिन्यांचा मान्सूनचा हंगाम संपुष्टात येईल.

Image Credits – NDTV

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES