गेल्या २४ तासांपासून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ वगळता महाराष्ट्रातील इतर भागांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. २८ ऑगस्ट पर्यंत राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाचे प्रमाण आणि पावसाळी गतिविधी कमी राहण्याची शक्यता आहे. २९ ऑगस्टच्या सुमारास पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता असून राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी मुंबईमध्ये पावसामध्ये वाढ होईल तसेच पुण्यातही पाऊस वेग घेईल.
गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागात मध्यम पावसाची नोंद झाली आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्रात काही मुसळधार सरींसह हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, कोकण आणि गोव्यात विखुरलेला पाऊस नोंदला गेला तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली.
सोमवारी सकाळी साडेआठपासून २४ तासांच्या कालावधीत जळगाव येथे ६७ मिमी, त्यानंतर वर्धा १७ मिमी, गोंदिया १६ मिमी, बुलढाणा, मालेगाव आणि वाशिम येथे प्रत्येकी १२ मिमी आणि अकोलामध्ये ११ मिमी पावसाची नोंद झाली.
आमच्या हवामानतज्ञांनुसार, २८ ऑगस्टपर्यंत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण आणि गोवा येथे विखुरलेला पाऊस सुरू राहील. तथापि, राज्याच्या इतर भागांत पावसाचे प्रमाण कमी राहील.
२९ ऑगस्टच्या सुमारास मॉंन्सून पुनरागमन करेल आणि कोकण आणि गोव्यात जोरदार सरींसह मध्यम पाऊस पडेल. या काळात मुंबईत देखील पाऊस वाढेल. एक किंवा दोन मुसळधार सरींची शक्यता आहे पण त्यामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही.
या पावसामुळे सध्याच्या उबदार व दमट हवामानातून आराम मिळेल आणि वातावरण सुसह्य होईल. २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पुणे शहरात एक किंवा दोन मध्यम सरींसह हलका पाऊस पडेल. त्याचप्रमाणे, बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर विदर्भाच्या पूर्व जिल्ह्यांमध्ये काही मध्यम सरींची शक्यता आहे.
Image Credit: Firstpost
Any information picked up from here should be attributed to Skymet Weather