सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रायलसीमा आणि तामिळनाडू वगळता देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात मान्सून सक्रिय होता. सौराष्ट्र-कच्छ, मराठवाडा, कोकण-गोवा, कर्नाटक किनारपट्टी, केरळ आणि तेलंगाणात चांगला पाऊस झाला. मात्र ईशान्य-भारतासह गंगेच्या खोऱ्यातील मैदानी भागात पावसाची कामगिरी चांगली नव्हती.
स्कायमेटकडे असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार १ जून ते ८ सप्टेंबर या कालावधीत, देशात ७६४.५ मिमी सामान्य पावसाच्या तुलनेत ७८२ मिमी पाऊस पडला आहे. एकोणीस टक्क्यांच्या अधिशेषासह मध्य भारत हा मुख्य लाभार्थी राहिला. चांगला पाऊस पडल्यानंतर दक्षिण द्वीपकल्पात फक्त एका आठवड्यात ४ टक्क्यांनी वाढ होऊन आता ११ टक्के पावसाचे आधिक्य आहे. पूर्व आणि ईशान्य भारत हा पावसापासून सर्वाधिक वंचित असलेला प्रदेश असून इथली कमतरता २० टक्के इतकी आहे.
मध्य आणि पूर्व भारतात सक्रिय मान्सूनची स्थिती
मध्य आणि पूर्व भारतात सक्रिय मान्सूनची परिस्थिती अनुभवली जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये चांगला पाऊस पडेल. गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता देखील नाकारता येत नाही.
आठवड्याच्या उत्तरार्धात उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारमध्येही चांगल्या पावसाची शक्यता असून पूर्व राजस्थान, उत्तर मध्यप्रदेश आणि दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात मुसळधार पावसाची नोंद होण्याची अपेक्षा आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी मध्यम सरींची अपेक्षा आहे. परंतु दिल्ली आणि एनसीआरमध्ये विखुरलेला पाऊस राहील.
दक्षिण द्वीपकल्पात हलका-मध्यम पाऊस पडेल. रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये सर्वात कमी पावसाळी गतिविधी अपेक्षित आहे. चेन्नईमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी असून वातावरण उष्ण व दमात राहण्याची शक्यता आहे.
साधारणत: पश्चिम घाटावर अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता असते. कोकण आणि गोव्यात आठवड्याच्या शेवटी मध्यम पावसाची नोंद होईल. या भागात तुरळक मुसळधार सरींची शक्यताही नाकारता येत नाही.
ईशान्य भारतात मध्यम पावसाची नोंद होईल. तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये बहुतांशी कोरड्या हवामानाची परिस्थिती असेल. साधारणतपणे मान्सून १ सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला सुरवात करतो. तथापि, या हंगामात सप्टेंबरच्या दुसर्या पंधरवड्यापासून परतीला सुरू होईल.
मुंबईत आठवड्याच्या पूर्वार्धात नियमित पाऊस
मुंबईकरांना २ सप्टेंबरपासून सलग तीन दिवस मुसळधार पावसाचा अनुभव आला. या मुसळधार पावसाने केवळ तीन दिवसात मासिक सरासरी ओलांडली. आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात नियमित पाऊस पडण्याची शक्यता असून आठवड्याच्या शेवटी जोर वाढू शकतो.
पिकांवर परिणाम
बहुतेक पिके फुल ते फळधारणेच्या टप्प्यावर असतात. आता अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे कारण यामुळे फुलं गळून पडण्याची शक्यता असते. मातीतला जास्त ओलावा देखील पिकांचे नुकसान करू शकतो. तथापि, या टप्प्यात हलका ते मध्यम पाऊस पिकांंसाठी अधिक फायदेशीर आहे. हीच वेळ आहे जेव्हा कीटक आणि रोगाचा प्रादुर्भाव देखील झपाट्याने पसरतो म्हणून पिकांवर बारीक नजर ठेवली पाहिजे आणि कीड लागल्यास ताबडतोब उपचारात्मक कारवाई केली पाहिजे.
Image Credits – Hindustan Times
Any information taken from here should be credited to Skymet Weather