[MARATHI] अंदमान निकोबार या बेटांवर मान्सूनचे आगमन वेळेवर होणार

May 13, 2015 5:19 PM | Skymet Weather Team

अंदमान निकोबार या बेटांवर मान्सूनचे आगमन वर्तविलेल्या वेळेत म्हणजे २० मे २०१५ रोजी होणार हे आता निश्चित म्हणावयास हरकत नाही. कारण मान्सूनपूर्व होणारे वातावरणातील बदल आता सर्वत्र वेगाने होताना दिसू लागले आहेत. त्यामुळेच मान्सूनचे आगमन हे अगदी जवळ असल्याचे दिसून येत आहे.

सर्वात आधी मान्सूनचे आगमन हे अंदमान निकोबार या बेटांवर होईल आणि मग पुढे उपसागर पार करत केरळात येऊन पोहचेल. या आगमनापूर्वी वातावरणात वेगवेगळे बदल होताना दिसतील उदाहरणार्थ हवा वाहण्याची दिशा, वेग, तीव्रता ढगाळ वातावरण, पाऊस, तापमान आणि आर्द्रता या सर्व घटकांत बदल होताना दिसतील. सद्यस्थितीत अंदमानच्या उपसागर आणि आजुबाजुच्या ठिकाणी हे वातावरणातील बदल तीव्रतेने जाणवतील.

मान्सून लवकर येण्यामागचा विचार केल्यास असे लक्षात येईल कि मान्सून साठी जी हवामान प्रणाली असते त्याच बरोबर अजून एखादी नवीन प्रणाली तयार झाल्यास हि प्रणाली आधीच्या प्रणालीस पूरक ठरून तीव्रतेत निश्चितच वाढ होते व मान्सून लवकर येतो. ह्या पूरक प्रणालीत चक्रवाती हवा किंवा कमी दाबाच्या हवेचे क्षेत्र यांचा समावेश असू शकतो. यंदा मान्सून लवकर येण्यामागे पूरक प्रणालीत दक्षिणेकडील द्वीपकल्पावरील चक्रवाती हवेचे क्षेत्र कारणीभूत असून त्यामुळे या भागात व्यापकतेने मुसळधार पाऊस होत आहे.

स्कायमेट या भारतातील हवामान संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार या पूरक प्रणालीचा प्रभाव येते ४८ तास होताना दिसेल आणि हि प्रणाली उत्तरेकडे सरकताना दिसेल. तसेच याचे रुपांतर कमी दाबाचे हवेचे क्षेत्र यात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच हि प्रणाली पूर्वेच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता असून त्यामुळे अंदमान मध्ये याचा परिणाम ढगांची गर्दी व पावसाच्या स्वरुपात दिसून येईल.

यावरूनच अंदमानचा सागर व उपसागर यात लवकरच मान्सून येऊन भिडेल असा अंदाज आहे. असे असले तरी काही दिवस पाऊस झाल्यावरच व पावसाळी वातावरण बराच काळ टिकणार असल्याचे दिसून आल्यावरच पूर्णपणे अभ्यासूनच मान्सून आला असे घोषित केले जाते. जर यात खूप मोठी तफावत किंवा वातावरणात एकदम शांतता दिसून आली तर मान्सूनचे आगमन हा भास आहे असे म्हणता येईल आणि मग या भागात दीर्घकालपर्यंत पाऊस झाल्यानंतर मान्सून आला असे जाहीर केले जाते.

Image Credit: cdn.thebeachfrontclub.com

OTHER LATEST STORIES