Skymet weather

[MARATHI] केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे वेळेवर होणार आगमन

May 21, 2015 4:59 PM |

kerala Monsoonवातावरणात वेगाने होणारे बदल हे मान्सूनच्या आगमनासाठी पूरक आहेत आणि म्हणूनच मान्सूनची सुरुवात वेळेवर होणार हे स्पष्ट झाले आहे.

भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या आभ्यासासाठी जी मॉडेल्स वापरली जातात त्यानुसार सध्या मान्सून श्रीलंकेच्या पलीकडे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण व मध्य भागात असल्याचे दिसून आले आहे.

अराकनची किनारपट्टी तसेच म्यानमारच्या किनारपट्टीकडील बंगालच्या उपसागरात मध्य भागात व वायव्य दिशेला घनदाट ढगांची दाटी झालेली दिसून आली आहे. गेले काही दिवस या भागात मुसळधार वृष्टी होत आहे आणि याचा अर्थ हि मान्सूनच्या आगमनाची नांदीच आहे असे म्हणायला हरकत नाही.

स्कायमेट या भारतीय संस्थेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अराकन किनारपट्टीवर जी घनदाट ढगांची गर्दी झाली आहे त्यामुळे तेथे चक्रवाती हवेचे अभिसरण होऊन कमी दाबाच्या हवेच्या क्षेत्राची तीव्रता वाढेल आणि या प्रणालीमुळे मान्सूनची लाट केरळपर्यंत वेगाने पोहचण्यास मदत होईल.

सध्या दक्षिणेतील द्वीपकल्पात पाऊस जरी ओसरला असला तरी काळजीचे काही कारण नाही, याला कारण म्हणजे या काळात वातावरणातील चढउतार हे अपेक्षितच असतात हे बदल दरवर्षीच होतात आणि ते तत्काळ असतात.

मान्सूनसाठी पूरक हवामान म्हणजे समुद्राचे उष्ण असणे आणि त्याच बरोबर दोन्ही गोलार्धातील उष्णकटिबंधीय हवा ज्या ठिकाणी एकत्र येते ते क्षेत्र (ITCZ) सक्रीय असणे.

अंदमान निकोबार येथे मान्सूनचे आगमन गेल्या शनिवारी १६ मे रोजी झालेले असून ते जाहीर केल्यानुसार ४ दिवस आधीच झालेले आहे. यामुळेच गेले काही दिवस बंगालच्या उपसागरात मुसळधार वृष्टी होते आहे.

स्कायमेट या संस्थेने मान्सूनचे केरळात होणारे आगमन वेळवरच होईल असा पुनरुच्चार केला आहे.

Image Credit (msnbcmedia.msn.com)

 

 

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try