[Marathi] येणाऱ्या २४ तासांत, संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन, पुणे, कोल्हापूर आणि नाशिक मध्ये जोरदार पाऊस

June 24, 2019 2:08 PM | Skymet Weather Team

दक्षिण पश्चिम मॉन्सून २०१९ ची महाराष्ट्रात प्रगती झालेली आहे व येणाऱ्या दिवसांत आणखी काही भाग देखील मॉन्सूनचा पाऊस अनुभवतील. येणाऱ्या २४ तासांत, मॉन्सूनचे संपूर्ण महाराष्ट्रात आगमन होणे अपेक्षित आहे. दरम्यान, पुणे, कोल्हापूर आणि नाशिक मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

गेल्या २४ तासात, मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस दिले आहेत. महाराष्ट्रातील चारही विभागात जसे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोंकण व गोव्यात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. पावसाच्या गतिविधीत वाढ झाल्यामुळे असे दिसून येत आहे कि येणाऱ्या २४ तासात संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन होईल.

गेल्या २४ तासांत, वेंगुर्ला मध्ये १३६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे, त्या नंतर बुलडाणा मध्ये ४७ मिलीमीटर, अकोला मध्ये २९ मिलीमीटर आणि मालेगाव मध्ये २५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील १० सर्वात पावसाळी ठिकाण:

हवामान प्रणाली आणि हवामान अंदाज

एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशावर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा महाराष्ट्राच्या किनारी भागांपासून केरळच्या किनारी भागांपर्येंत विस्तारलेली आहे. येणाऱ्या २४ तासांत, मध्य महाराष्ट्रात, म्हणजेच, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, मालेगाव आणि पुणे मध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे, त्यांनतर, पावसाचा जोर कमी होईल.

मुंबईसह उत्तर कोंकण व गोव्या बद्दल सांगायचे तर, गेल्या २४ तासात, हवामान कोरडेच राहिलेले आहे. एक दोन ठिकाणी तुरळक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तथापि, उपस्थित असलेल्या ट्रफ रेषेमुळे, मुंबई आणि त्याच्या आसपास येणाऱ्या २४ तासात, पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे. पुढील, २७ जून रोजी मुंबईसह संपूर्ण उत्तर किनारी महाराष्ट्रात जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होईल. कारण आहे, चक्रवाती परिस्थिती जी आधी छत्तीसगढ़वर बनलेली होती, ती आता पश्चिम दिशेत वळली आहे. ज्यामुळे दोन्ही विभागात पावसाचा जोर कमी होईल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES