[Marathi] महाराष्ट्रातील पाऊस सुरूच राहणार , मान्सूनचे आगमन २४ तासांत

June 7, 2018 3:09 PM | Skymet Weather Team

काल दिवसभर महाराष्टामध्ये मुसलदार पाऊस झाला आहे . त्यामुळे कमाल तापमान ४५ अंशावरून कमी होऊन ३० अंशापर्यंत नोंदविले गेले आहे.

मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण मधे पाऊस जास्त झाला आहे ,त्यामानाने मराठवाडा आणि विदर्भ भागांत पाऊस तुलनेत कमी आहे.

बुधवारी सकाळी ८. ३० पासुन २४ तासात यवतमाळ येथे ४५ मिमी ,मुंबई कुलाबा ३६ मिमी, उदगीर २४ मिमी, रत्नागिरी २० मिमी, पुणे १९ मिमी, सोलापूर १९ मिमी, महाबळेश्वर १७ मिमी , वर्धा १६ मिमी, जळगाव १३ मिमी, सांगली ९ मिमी, परभणी ७ मिमी , नागपूर ६ मिमी आणि मालेगाव ४ मिमी.,अशी पावसाची नोंद झाली आहे.

स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचे कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी कमी होईल अशी शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्टयामुळे निर्माण झालेले वारे सध्या दक्षिण कोकणकडून मध्य महाराष्ट्र ओलांडून केरळ कडे वाटचाल करत आहे.

[yuzo_related]

त्यामुळे मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि कोकण मध्ये पाऊस जास्त पडण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, आपन ज्याची खुप आतुरतेने वाट पाहत आहोत त्या मौसमी पावसाचे आगमन येत्या २४ तासात होईल अशी दाट शक्यता आहे.

हवामानाचा कृषी विभागावर होणारा परीणाम पाहू ;

शेतकरी बंधूनी शेताची मशागत पूर्ण करून ,नांगरणी करून खरीप सोयाबीन ,बाजरी ,ज्वारी यांची पेरणी करावी . जिथे वारा आणि वादळ होण्याची शक्यता आहे तेथील शेतकरी बंधूनी रोपांना, झाडांना आधार द्यावा . मध्य महाराष्ट्र व कोकण मधील शेतकरी बंधूनी पाऊस जास्ती असल्या कारणाने फवारणी ,पानी देणे ह्या गोष्टी करू नये . दक्षिण कोंकण मधे भाताची लावणी सुरु ठेवावी.

Image Credit: YouTube

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे

 

OTHER LATEST STORIES