[Marathi] अवघ्या २४ तासांत सक्रिय मान्सूनमुळे महाराष्ट्राच्या काही भागांत १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस

September 3, 2019 1:26 PM | Skymet Weather Team

गेल्या २४ तासात कोकण आणि गोव्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून ठाण्यात १९० मिमी, त्यानंतर रत्नागिरीमध्ये १३६ मिमी, अलिबाग १३३ मिमी, सांताक्रूझ (मुंबई) १३१ मिमी, हर्णेमध्ये ९४ मिमी आणि कुलाबामध्ये (मुंबई) ८० मिमी पावसाची नोंद झाली.

मुंबईत चांगला पाऊस झाला, तर विदर्भाच्या काही भागात मध्यम सरी बरसल्या. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला परंतु मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत कोरडे हवामान राहिले.

सध्या ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टीवर परिणाम होईल आणि मान्सून सक्रिय होईल. शिवाय, कोकण आणि गोवा ते पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विभिन्न वेगाने वारे एकमेकास कापत वाहत आहेत. या प्रणाली व्यतिरिक्त, गुजरातमध्ये चक्रवाती परिभ्रमण आहे.

या सर्व हवामान प्रणालींमुळे पुढील आणखी ४८ तास कोकण आणि गोवा तसेच मुंबई आणि उपनगरांत मान्सून सक्रिय राहील. दरम्यान, विदर्भात एक-दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस पडेल.

या काळात मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि मालेगाव या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र पुण्यामध्ये पावसाचे स्वरूप हलके राहील.

पुढील २४ ते ४८ तासांत विदर्भालगतच्या मराठवाड्यातील काही भागांत एक ते दोन मध्यम सरींची शक्यता आहे. त्यानंतर, तीव्रता कमी होईल, परंतु विदर्भ, कोकण आणि गोवा येथे अधून मधून पाऊस चालू राहील.

Image Credits – Times of India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES