[MARATHI] मान्सूनचे अंदमान निकोबार बेटांवर आगमन, केरळला वेळेआधीच येण्याचे चिन्ह

May 18, 2015 4:08 PM | Skymet Weather Team

स्कायमेट या भारतातील हवामान संस्थेने वर्तविल्यानुसार नैऋत्य मान्सूनचे आगमन अंदमान निकोबार या बेटांवर शनिवारी १६ मे रोजी झालेले असून पूर्वी वर्तविल्यानुसार सर्वसाधारणपणे २० मे रोजी येणाऱ्या मान्सूनची हजेरी ४ दिवस आधीच लागलेली आहे. मान्सूनची उत्तरेकडील सीमारेषा अक्षांश ५ अंश उत्तर आणि रेखांश ८६ अंश पूर्व व १५ अंश उत्तर आणि ९८ अंश पूर्व या दोन बिंदुतून जात आहे.

केरळात मान्सून येण्याची चिन्हे

मान्सूनचा उत्तरेकडे सरकण्याचा प्रवास हा श्रीलंकेहून पुढे बंगालचा उपसागर पार करत केरळात आगमन असा असतो. ह्या सर्व प्रक्रियेस साधारणपणे ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. आणि याचा अर्थ स्कायमेट या हवामान संस्थेने पूर्वीच वर्तविल्यानुसार मान्सून केरळात ३ ते ४ दिवस आधी येण्याची शक्यता आता खरी ठरलेली दिसते आहे आणि १ जून पूर्वीच केरळात हजेरी लागेल असे दिसते.

पश्चिम प्रशांत महासागरातील प्रचंड चक्रीवादळ आणि त्याचा परिणाम

मान्सून साठी वातावरणातील गरजेचे बदल म्हणजे चाक्रीवाताचे अभिसरण, कमी दाबाचे क्षेत्र आणि हवेतील कमी दाबाची स्थिती आणि याच बरोबर या मोसमात प्रशांत महासागर आणि चीनचा दक्षिणेकडील समुद्र यात होणारी प्रचंड चक्रीवादळे. जेव्हा प्रशांत महासागरात अशी एखादी चक्रीवादळाची प्रणाली तयार होते तेव्हा त्याचा परिणाम बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रवती हवेच्या अभिसरणावर होऊन त्याची तीव्रता कमी होते.

तसेच या प्रणालीमुळे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अंदमानचा सागर यावर वाहणाऱ्या हवेवर होतो आणि यामुळे मान्सूनची तीव्रता वाढण्यास मदतच होते.

सध्यस्थितीत पश्चिम प्रशांत महासागरात डॉल्फिन नावाच्या चक्रीवादळाची हालचाल दिसलेली असून ती जपानच्या मुख्यभूमी पासून दूर सरकताना दिसत आहे.

डॉल्फिन या चक्रीवादळाची भारतातील मान्सूनची तीव्रता आणि वेग वाढण्यास मदतच होणार आहे. हे चक्रीवादळ हळूहळू उत्तरेकडे सरकत असल्यामुळे येत्या ३ ते ४ दिवसात म्यानमार, बांगलादेश व उत्तर्पुर्वेकडील भारतात व्यापक मुसळधार वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच या प्रदेशांच्या आजूबाजूला असलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

(Featured Image Credits: beyondlust.in)

OTHER LATEST STORIES