Skymet weather

[Marathi] महाराष्ट्रात काही भागात पावसाचे पुन्हा जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता, बचावकार्य अद्याप सुरू आहे

August 12, 2019 3:05 PM |

Maharashtra rain

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, महाबळेश्वरने सलग २० व्या दिवशी जोरदार पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत येथे ६८ मिमी पाऊस पडला आहे. तथापि,

बऱ्याच भागात केवळ विखुरलेला पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि गोव्याच्या भागातही अशीच परिस्थिती दिसून आली. याउलट मराठवाडा अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. प्रत्यक्षात हा विभाग दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरा जात आहे.

अशाप्रकारे, राज्यात एक विरोधाभासी परिस्थिती दिसून येत आहे. एकीकडे नुकत्याच झालेल्या पुरामुळे दोन लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, तर दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळी भागात मेघ-बीजारोपण चालू आहे, येथे जवळजवळ सर्व धरणे कोरडी आहेत. मध्य महाराष्ट्रात अद्यापही मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे.

हवामानाचा अंदाजः

उत्तर बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा पाऊस विदर्भात पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली पुढे मध्य भारताकडे वेगाने वळेल.

त्यामुळे विदर्भात आज एक-दोन मुसळधार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होईल. उद्या, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून आणि मुसळधार ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

दरम्यान, मराठवाड्यात पुढील काही दिवस विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल. तसेच येत्या दोन दिवसात कोकण आणि गोवा व नाशिक, पुणे आणि मालेगावसह मध्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल आणि येथे मध्यम सरी असण्याची शक्यता आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १४ ऑगस्टच्या सुमारास पुन्हा एकदा मुंबईत पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. या कालावधीत शहरात एक किंवा दोन जोरदार सरींसह मध्यम पावसाची शक्यता आहे.

सध्या महाराष्ट्रात पावसाचे आधिक्य ३४% आहे, ज्यामध्ये मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण ७५% जास्त आहे. खरं तर, इतके मोठे आधिक्य असलेला हा एकमेव प्रदेश आहे. या अचानक झालेल्या वाढीचे श्रेय दक्षिण कोकण प्रदेशात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाला दिले जाऊ शकते. याकाळात सांगली, सातारा, कोल्हापूरसारख्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, तर नाशिक, मालेगाव, पुणे, जळगाव आणि महाबळेश्वर या ठिकाणी देखील पावसाने हजेरी लावली.

या खालोखाल कोकण आणि गोवा येथे ४७% पावसाचे आधिक्य आहे. विदर्भ समतुल्य असला तरी, आधिक्य किंवा पावसाची कमतरता नाही. उलटपक्षी कमी पावसामुळे मराठवाड्यात पावसाची १८% तूट आहे.

Image Credits – The Indian Express

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try