गेल्या २४ तासांत कोकण आणि गोवा येथे पावसात लक्षणीय घट झाली आहे. विशेषतः मुंबईसह उत्तर कोकण आणि गोवा मध्ये गेल्या काही दिवसापासून अत्यंत कमी पाऊस पडत आहेत. खरं तर, दक्षिण कोकण आणि गोवा वगळता (येथे अद्याप पाऊस सुरु आहे) जवळपास संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी झाली आहे.
स्कायमेटनुसार, पुढील २४ तासांत महाराष्ट्रात (दक्षिण कोकण आणि गोवा वगळता) मान्सूनचा जोर कमी राहील. त्यानंतर, १९ जुलै दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीपासून सरकणाऱ्या चक्रवाती प्रणालीमुळे हा पाऊस पडेल. दरम्यान, २१ आणि २२ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात पावसात वाढ होईल. या काळात, महाराष्ट्रातील अंतर्गत भागांत मध्यम पावसाच्या सरींसोबत काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे.
तथापि, २२ जुलैपर्यंत मुंबईत पावसाचा जोर नसणार. त्यानंतर, मुंबई, डहाणू आणि ठाणे या किनारी भागात पावसाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे, २३ आणि २६ जुलै दरम्यान मुंबईसह महाराष्ट्राच्या उत्तर किनारी भागांत थोड्याफार पावसाची शक्यता आहे. दरम्यान या कालावधीत, मुंबई आणि उपनगरात एक ते दोन मुसळधार सरींमुळे सखल भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
अपुऱ्या पावसामुळे विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही क्षेत्रांत पावसाची कमतरता ३६% आहे तर चांगल्या पावसामुळे कोकण आणि गोवा येथे १८% आणि मध्य महाराष्ट्रात ९% पावसाचे आधिक्य आहे.
प्रतिमा क्रेडीट: डीएनए इंडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे