उशिरा आगमनानंतरही राज्यात मॉनसूनने समाधानकारक प्रगती केली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मध्य-महाराष्ट्रासह कोकण आणि गोवा भागात चांगला पाऊस होत आहे.
गेल्या २४ तासांत महाबळेश्वरमध्ये २३ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर सोलापूर १७ मिमी, नाशिक १६ मिमी, मालेगाव १५ मिमी आणि कुलाबा (मुंबई) येथे ७ मिमी पाऊस झाला आहे.
गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील १० सर्वात जास्त पावसाची ठिकाण
स्कायमेटच्या मते, एक चक्रवाती प्रणाली दक्षिणपश्चिम मध्यप्रदेशात आहे. आणि एक ट्रफ रेषा महाराष्ट्र किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत विस्तारत आहे. ज्यामुळे पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हळूहळू कोकण आणि गोव्या मध्येही पावसाचा जोर वाढेल. तसेच पुणे, कोल्हापूर आणि नाशिक मध्ये पुढील दोन दिवसांत दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये देखील पावसाचा जोर वाढेल व २७ ते ३० जून दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. खरंतर, मुंबईमध्ये एक किंवा दोन मुसळधार सरींची शक्यता देखील नाकारता येत नाही.
दरम्यान, चंद्रपूर, ब्रम्हपुरी आणि गोंदियासारख्या विदर्भातील काही भागात विखुरलेला पाऊस सुरू राहील. याउलट, मराठवाड्यातील हवामान मात्र कोरडेच राहिल. तथापि, पुढील दोन दिवसांत एक दोन ठिकाणी हलका पाऊस होवू शकतो.
बंगालच्या खाडीतील संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्राच्या निर्मितीमुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात गडगडाटासह चांगला पाऊस अपेक्षित आहे. ही प्रणाली सुरुवातीला आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी वर आणि तेलंगाणाकडे प्रवास करेल आणि त्यानंतर विदर्भाकडे वळेल.
आतापर्यंत विदर्भात मोठा प्रमाणात पावसाची कमतरता राहिली आहे. तसेच कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातही कमी पाऊस पडला आहे. तथापि, चालू असलेल्या चांगल्या पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील पावसाची कमतरता कमी होईल अशी अपेक्षा आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे