सध्या महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कमी झाला आहे.खरेतर, परवाच्या दिवसापेक्षा कालच्या दिवशी राज्यातील बहुतांश भागात पाऊस कमी पडला होता. विदभा मधे माञ परवा जोरदार पाऊस पडला होता, तर कालच्या दिवशी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
दुसरीकडे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा राहिला, तर दक्षिण कोकण क्षेत्रा मधे कमी पाऊस पडला.उलटपक्षी, मराठवाडा मधे तुरळक पावसाची नोंद झाली आहे.
मंगळवारी सकाळी ०८:३० पासून गेल्या २४ तासात, कोल्हापूर येथे ३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तसेच हर्णै २९मिमी, सातारा २२ मिमी, रत्नागिरी २१ मिमी, नाशिक १५ मिमी, मुंबई कुलाबा १४ मिमी नोंद आणि सान्ता क्रूज़ १० मिमी , गोंदिया १२ मि.मी., परभणी ११ मिमी, पुणे ६ मिमी, नागपूर ५ मिमी, ब्रह्मपुरी ३ मिमी आणि अलिबाग 3 मिमी.
अशी पावसाची नोंद झाली आहे. स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार मराठवाडा मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र मधील अनेक भागांत पावसाची तीव्रता कमी होऊ शकते . विदर्भातील उत्तरी जिल्हे जसे गोंदिया, नागपूर, वर्धा आणि चंद्रपुर यांना चांगल्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो.
पुढील २४ तासांत दक्षिण कोकण मधे चांगला पाऊस व उत्तर कोंकण मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. पावसामध्ये बदल होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे दक्षिण गुजरात मध्ये निर्माण झालेले चक्री वादळ असु शकते असा स्काय मेट वेदर चा अंदाज आहे.
हवामानाचा कृषी घटकावर होणारा परीणाम पाहू;
कोकण मधील शेतकरी बंधूनी भाजीपाला पिकाला आधार द्यावा त्यामुळे वाऱ्यापासून संरक्षण होईल तसेच पाऊस कमी झाला की पिकांना फवारणी करावी. विदर्भामधील शेतकरी मित्रांनी खरीफ पिकांची लावणी करून घ्यावी.
मध्य महाराष्टामधील शेतकरी बंधूनी खुरपणी व इतर कामे करून घ्यावीत तसेच पिकांमधील व फळ बागेतील जास्तीचे साचलेले पानी काढुन टाकावे.
Image Credit: YouTube
ये थून घेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.