[Marathi] नाशिक, औरंगाबाद आणि अकोला येथे अजून पावसाची शक्यता

June 15, 2017 5:42 PM | Skymet Weather Team

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बऱ्याच भागात चांगला पाऊस होत असून काही भागात तर गेले  दोन तीन दिवस झाले जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर म्हणजेच कोकणात मुसळधार पाऊस होतो आहे त्याच बरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही चांगला पाऊस होताना दिसून येतो आहे. परंतु विदर्भात मात्र पावसाची तीव्रता कमी आहे.

बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात बऱ्याच भागात चांगल्याच पावसाची नोंद झाली आहे, पुणे येथे ५६ मिमी, औरंगाबाद येथे ४० मिमी, मुंबई येथे १९ मिमी, रत्नागिरी येथे १४ मिमी, अकोला येथे १० मिमी, परभणी येथे ४ मिमी आणि माथेरान येथे ३ मिमी एवढ्या  पावसाची नोंद झालेली आहे.

मान्सूनची लाट सक्रीय झाल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी पाऊस होतो आहे आणि त्याबरोबरच पूर्वेकडे असलेल्या चक्रीवादळामुळे वातावरणातील आर्द्रता वाढून त्याचीही मदत होताना दिसते आहे.

आमच्या हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे काही दिवस किनारपट्टी लगतच्या भागात तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे  अजूनही असाच पाऊस सुरु राहील. तसेच मुंबईकर आणि पुणेकर सध्या चांगला पाऊस अनुभवत आहेत, येत्या २४ तासात येथेही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि याच दरम्यान विदर्भात मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.  

[yuzo_related]

Image credit: ToI

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES