कमकुवत मान्सूनच्या परिस्थितीने महाराष्ट्राच्या बहुतेक भागांचा ताबा घेतला असून केवळ कोकण आणि गोव्यात गेल्या २४ तासांत काही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी अनुभवण्यात आल्या. या काळात नेहमीप्रमाणेच मराठवाड्यात तुरळक व हलका पाऊस राहिला आहे. मुंबईतही तुरळक सरी अनुभवल्या गेल्या.
मागील चोवीस तासांच्या कालावधीत वेंगुर्ला येथे २४ मिमी, हर्णेत १० मिमी, रत्नागिरी मध्ये ९ मिमी, महाबळेश्वर येथे ७ मिमी पाऊस नोंदला गेला.
आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, येत्या २४ तासांत विदर्भातील काही भागात विखुरलेला पाऊस परतण्याची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथे विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस होण्याची अपेक्षा आहे.
दुसरीकडे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या हवामानात कोणतेही विशेष बदल अपेक्षित नसून पुढील तीन ते चार दिवस तुरळक हलक्या पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे या भागात जवळपास कोरडेच हवामान राहील.
दरम्यान पुण्यात हलक्या पावसासह कोरडे हवामान राहण्याचा अंदाज असून मुंबईत काही तुरळक सरींची शक्यता आहे.
येत्या २ किंवा ३ सप्टेंबरच्या आसपास कोकण आणि गोव्यातील हवामानाची परिस्थिती बदलण्याची शक्यता असून या भागात पावसाळी गतिविधी वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत मुंबईत देखील मध्यम पावसाची अपेक्षा आहे, तथापि, हा पाऊस दैनंदिनीमध्ये व्यत्यय आणणारा नसेल.
Image Credits – ABC15
Any information taken from here should be credited to Skymet Weather