Updated on 04 August 6:27 PM (IST): अखेरीस विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस
अपेक्षेप्रमाणे विदर्भात पावसाची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिमेकडे सरकले आहे. सध्या हि हवामान प्रणाली मध्यप्रदेशाच्या आग्नेय भागावर तसेच त्यालगतच्या विदर्भावर आली आहे.
गेल्या २४ तासात या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे मध्यप्रदेश आणि विदर्भात व्यापक असा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरु आहे.
सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात या भागात झालेल्या पावसाचा आढावा घेऊ या: नागपूर येथे ४८ मिमी, वर्धा येथे ५९ मिमी, अमरावती येथे ३२ मिमी, अकोला येथे ३१ मिमी, यवतमाळ येथे २७ मिमी, ब्रम्हपुरी येथे २४ मिमी आणि वाशीम येथे १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुढचा एक दिवस अजूनही धुंवाधार पाऊस असाच सुरु राहील. त्यानंतर या पावसाची तीव्रता कमी होईल आणि बऱ्याच भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस येत राहील.
सध्यस्थितीत मराठवाडा मात्र कोरडाच आहे आणि या भागातील पावसाची तुट ५८% झाली आहे. सोमवारी या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असून या पावसाचा जोर आता वाढलेला आहे. तसेच ६ ऑगस्ट पर्यंत असाच पाऊस सुरु राहील.या पावसामुळे मराठवाड्यातील पावसाची तुट भरून निघण्यास थोडीफार मदत होईल.
Updated on 03 August 6:57 PM (IST): विदर्भातील आणि मराठवाड्यातील कोरडेपणा लवकरच संपुष्टात येणार
विदर्भ आणि मराठवाड्यात असलेला बिनपावसाचा काळ आता लवकरच संपुष्टात येणार आहे. आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे सध्या झारखंड आणि उत्तर छत्तीसगडवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आहे. हि हवामान प्रणाली लवकरच पश्चिमेकडे सरकत असून त्याचा प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्यावर लवकरच दिसून येईल.
या मान्सून पर्वात मध्य भारतात चांगलाच पाऊस झालेला आहे. आणि महाराष्ट्रातील बऱ्याच भागातही चांगला पाऊस झालेला आहे तसेच ३० जून पर्यंत विदर्भात ५२ % जास्त पावसाची नोंद झाली होती आणि मराठवाड्यात सामान्य पातळीजवळ म्हणजेच १७% कमी पावसाची नोंद झाली होती.
विदर्भातील हवामान
जून महिन्यात संपूर्ण महिनाभर चांगला पाऊस झाला पण जुलै महिन्यात मात्र अपुराच पाऊस झाला. अगदीच केंव्हातरी नागपूर, वाशीम आणि चंद्रपूर येथे मान्सूनचा पाऊस झाला. परंतु हा पाऊस मान्सूनची नेहमीची पातळी गाठण्यासाठी फारच तोकडा होता. २ ऑगस्ट पर्यंत विदर्भाची पावसाची तुट २२% झाली आहे.
या आधीच सांगितल्यानुसार सध्या झारखंड आणि उत्तर छत्तीसगड यावर एक चांगले कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते लवकरच पश्चिमेकडे सरकेल असा अंदाज आहे. ४ व ५ ऑगस्टला त्यामुळे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल.
मराठवाड्यातील हवामान
मराठवाड्यातील परिस्थिती अजूनही तशी फारशी चांगली नाही. २ ऑगस्ट पर्यंत येथील पावसाची तुट ५०% झाली आहे. मध्य भारतावर असलेल्या हवामान प्रणालीमुळे या भागात ४ ऑगस्टला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणे अपेक्षित आहे. मराठवाडा गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे कोरडाच आहे. आता येणाऱ्या पावसाची तीव्रता विदार्भाइतकी नसली तरी या पावसामुळे थोडासा दिलासा नक्कीच मिळेल.
हिंगोली, जालना, परभणी, औरंगाबाद आणि नांदेड या शहरात मान्सूनचा चांगला पाऊस होईल. तसेच बीड, लातूर आणि उस्मानाबाद येथे हलका व तुरळक स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे.
७ ऑगस्ट नंतर विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल पण मराठवाडा मात्र पुन्हा कोरडाच असेल.
Image Credits: Times Of India