गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि लगतच्या भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तसेच येत्या ४८ तासात पुन्हा पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे.
बुधवारी दिवसभर जोरदर ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली मात्र रात्री पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २४ ते ४८ तासात फारसा जोरदार पाऊस येणार नाही परंतु गुरुवारी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस येतच राहील.
स्कायमेट या संस्थेनुसार मध्य भारतावर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने मुंबईत मोठ्या प्रमाणत पाऊस झाला आणि आता या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर चक्रवाती अभिसरणात झाले असून ते महाराष्ट्रापासून दूर सरकले आहे. त्यामुळेच पावसाची तीव्रता कमी झाली आहे.
सध्या ह्या प्रणालीमुळे गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ या भागात तसेच लगतच्या पाकिस्तानात पाऊस होतो आहे.
स्कायमेट या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मध्य भारताकडे आणि एक चक्रवाती हवामान प्रणाली सरकते आहे. हि प्रणाली महाराष्ट्राच्या जवळ असल्याने मुंबई व लगतच्या भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होईल.
आतापर्यंत मुंबईत १९१.७ मिमी पावसाची नोंद झाली असून हि नोंद मासिक सरासरीपेक्षा(८०० मिमी ) खूपच कमी आहे. आता जुलै महिना संपण्यास फक्त सातच दिवस राहिले असून हा मासिक सरासरीचा आकडा गाठणे तसे अवघड आहे. परंतु सध्या असलेल्या हवामान प्रणालींमुळे होणाऱ्या जोरदार पावसामुळे सरासरीच्या आकड्याच्या जवळपास तरी येईल असा अंदाज आहे.
बुधवारी सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात मुंबई आणि लगतच्या परिसरात झालेल्या पावसाचा आढावा पुढीलप्रमाणे
Image Credit: kolkata24X7.com