[Marathi] मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात चांगला मान्सूनचा पाऊस, विदर्भ आणि मराठवाडातील भागात हलका पाऊस

July 22, 2019 11:16 AM | Skymet Weather Team

सध्या दक्षिण-पश्चिम मान्सून दक्षिण कोकण आणि गोवा येथे सक्रिय आहे, तर उत्तर कोकण क्षेत्रात सामान्य आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील उर्वरित भागात मान्सून कमकुवत आहे.

गेल्या २४ तासांत कोंकण आणि गोवा येथे काही ठिकाणी जोरदार पावसासह बहुतांश ठिकाणी मध्यम पाऊस झाला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या पावसाचे दर्शन झाले आहे. विदर्भ क्षेत्रातील काही भागात चांगल्या पावसाचे दर्शन झाले आहे. तथापि, मराठवाडाचे हवामान जवळपास कोरडे राहिले आहे.

रविवारी सकाळी ८:३० वाजता पासून शेवटच्या २४ तासांत, रत्नागिरीमध्ये ७७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर महाबलेश्वर मध्ये ५७ मिमी, वेंगुर्ला मध्ये ३७ मिमी, हर्णै मध्ये ३५ मिमी, वर्धा मध्ये २६ मिमी, कोल्हापूर मध्ये २१ मिमी, सातारा मध्ये १९ मिमी आणि सांताक्रूज (मुंबई) १६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, एक चक्रवाती परिस्थिती उत्तर मध्य महाराष्ट्रात विकसित झाली आहे. पुढील ४८ तासांत, मध्य महाराष्ट्रात ही प्रणाली चांगला पाऊस देईल. दरम्यान, कोकण आणि गोवा येथे हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील. कोकणच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये एक दोन ठिकाणी जोरदार सरींची शक्यता नाकारता येणार नाही.

मराठवाडाचे क्षेत्र पुढील दोन दिवसांत विखुरलेल्या पावसाचे निरीक्षण करू शकतात. त्यानंतर, तीव्रता वाढू शकते आणि विविध तीव्रतेसह पाऊस येथे २७ जुलैपर्यंत चालू राहील, असे दिसून येत आहे.

याउलट, विदर्भातील हवामान २४ जुलैपर्यंत हलक्या पावसासह मुख्यतः कोरडे राहील. त्यानंतर या क्षेत्रात मान्सूनचा चांगला पाऊस दिसू शकतो.

मुंबई आणि आसपासच्या भागात २४ आणि २८ जुलै दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता आहे. या कालावधीत काही ठिकाणी जोरदार सरींची देखील अपेक्षा आहे ज्यामुळे बर्याच ठिकाणी वॉटर-लॉगिंग आणि ट्रेफिक जाम होऊ शकतात.

प्रतिमा क्रेडीट: द लाइव नागपुर

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES