महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून चा पाऊस चांगलाच बरसत आहे ,काल तर मान्सूनच्या पावसामुळे मुंबई शहरातील अनेक भागांत हाहाकार उडाला होता.
कोकण विभागाने राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत खूप तीव्र पाऊस नोंदविला आहे. मुंबई शहरात गेल्या २४ तासांत तीन अंकी पावसाची नोंद झाली आहे,कारण २४ जून ला नेहमी पेक्षा २९ % पाऊस जास्ती झाला.
२४ तासांच्या कालावधीत, रविवारी सकाळी ०८.३० पासुन मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेने २३१ मि.मी. पावसाची नोंद केली, तसेच डहाणू २३१ मिमी, ठाणे १७० मिमी, अलिबाग १५० मिमी, कुलाबा ९९ मिमी, रत्नागिरी ९६. ५ मिमी, महाबळेश्वर ४७ मिमी, कोल्हापूर ९ मिमी, नाशिक १२ मि.मी., बुलढाणा ११मिमी, कोल्हापूर ९ मिमी आणि सांगली २ मिमी.अशी पावसाची नोंद झाली आहे.
स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार उत्तर कोंकण आणि शेजारच्या दक्षिण गुजरातवर चक्री वादळ निर्माण होत आहे त्याचप्रमाणे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वारे केरळाकडे वाहत आहेत . या पार्श्वभूमीवर,उत्तर कोकणातील काही भागांत, मुंबई, ठाणे, डहाणू, आणि अलिबाग सारख्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता स्काय मेट वेदर नी वर्तवली आहे.
शिवाय, मध्य महाराष्ट्र, नाशिक, जळगाव या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो. त्या उलट मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाची तीव्रता तुलनेने कमी आहे. तथापि, या ठिकाणी पाऊस तीव्रता २७ जून आणि २८ ला वाढू शकते. पुढील दोन ते तीन दिवस चांगला पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होण्याची दाट शक्यता आहे.
[yuzo_related]
हवामानाचा कृषी घटकांवर होणारा परीणाम पाहू;
कोकणातील शेतकरी बंधूनी भात पिकाची लावणी व पेरणी सुरु ठेवावी. त्याचप्रमाणे आंबा, फणस, सुपारी यांची लागवड करावी. मराठवाडा, विदर्भ येथील शेतकरी मित्रांनी सोयाबीन, बाजरी, कापूस, वाटाणा, मका, आणि भुईमूग इत्यादी पिकांची पेरणी सुरू करावी. ढगाळ हवामानामुळे कपाशी सारख्या पिकाला कीड लागु शकते म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी.
Image Credit: YouTube
येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.