Skymet weather

[Marathi] मॉन्सन 201 9: मरगळलेला मॉन्सून लवकरच भरारी घेणार

June 21, 2019 6:01 PM |

Monsoon in India

सामान्यत: मान्सूनला केरळमध्ये १ जून रोजी प्रारंभ होतो, परंतु नेहमीच आगमन काही दिवस पुढे मागे होत असते. यावेळी नैऋत्य मान्सून उपसागरी भागात जरी लवकर पोहोचला, परंतु केरळ मध्ये तो एक आठवड्याच्या विलंबाने ८ जून रोजी पोहोचला. भूतकाळात मान्सूनच्या आगमनावर नजर टाकल्यास, १८ जून १९७२ हि सगळ्यात उशिरा तारीख असून १८ मे २००४ रोजी सगळ्यात लवकर मान्सूनचे आगमन झाले होते. १९७१ ते २०१९ च्या दरम्यान मान्सूनच्या प्रारंभाविषयी बोलायचे झाल्यास १९७२, १९७९, १९८३, १९९५, १९९७, २००३, २०१६ आणि २०१९ या सालात मान्सूनची ८ जून रोजी किंवा त्यानंतर मुख्य भूप्रदेशात सुरुवात झाली.

जूनमधील सर्वात कमकुवत मानसून

या वरील आठ वर्षांमधील फक्त दोन वर्षात जूनमध्ये पावसाचे प्रमाण सामान्य होते. जून १९७२ मध्ये देशात १२३. ३ मिमी, १९७० मध्ये १४०. ५ मिमी, १९८३ मध्ये १५०. ८ मिमी, १९९४ साली १४३. ३ मिमी,१९९७ मध्ये १७१. ७ मिमी, २००३ मध्ये १६६. ६ मिमी आणि २०१६ साली १७४. ६ मिमी पावसाची नोंद झाली. उर्वरित वर्षांत सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला. यावर्षी देशात २० जून पर्यंत ५३. ८ मिमी पावसाची नोंद झाली असून,९४. ३ मिमीच्या तुलनेत पावसाची ४३ टक्के तूट आहे.

जून मधील सगळ्यात कमी पाऊस १२३ मिमी १९७७ साली झाला होता त्या वर्षाइतके प्रमाण जुळण्याकरिता उर्वरित जूनमध्ये सामान्य पावसाची गरज आहे परंतु यंदा तशी शक्यता दिसत नाही. यावर्षी जून महिना पावसाच्या बाबतीत सगळ्यात कमकुवत असू शकतो. ७५. २ मिमी पावसासाठी दररोज ७ मि.मी. पावसाची गरज आहे.

सुस्थ मान्सून

मान्सूनचा वेग या वर्षी नेहमी इतका नाही. उशीरा प्रारंभ झाला तर व्याप्ती पण उशीरा असे नसून भूतकाळात काही वर्षी मान्सूनने उशीरा सुरुवात केली परंतु त्याची व्याप्ती वेळेत झाली होती. देशात मान्सूनचे सगळ्यात लवकर आगमन २०१३ साली झाले, केरळवर ८ जून रोजी तर १६ जून रोजी मान्सून संपूर्ण देशामध्ये पोहोचला होता. १५ जून रोजी उत्तर प्रदेशच्या काही भागावर मान्सून पोहोचला आणि एका दिवसात वेग घेऊन त्याने संपूर्ण देश व्यापला होता.
मान्सूनचा वेग पश्चिम किनाऱ्याकडे सामान्य राहतो आणि पूर्वेस अडखळतो. २०१५ मध्ये, मान्सून डहाणूत वेळेत पोहोचला परंतु पूर्वेकडील भागात उशिरा पोहोचला. २६ जूनपर्यंत संपूर्ण देशात मान्सून पोहचला होता. यावर्षी मात्र पश्चिम किनाऱ्यावर मान्सूनची प्रगती मंद असली तरी कोलकातामध्ये मान्सून ची सुरुवात झाली आहे.

गेल्या वर्षी, २०१८ मध्ये मुंबईत मान्सून ९ जून रोजी सुरु झाला व २९ जूनला संपूर्ण देशात मान्सून पोहोचला होता, पूर्वेकडील भागात मान्सूनची प्रगती झपाट्याने झाली होती. याशिवाय, २०१७ मध्ये मान्सूनचे मुंबईत वेळेवर आगमन झाले होते परंतु संपूर्ण देशभर पोहोचायला (म्हणजेच १९ जुलै पर्यंत) नेहमीपेक्षा चार दिवस उशीर झाला होता. म्हणजेच मान्सून मंद किंवा वेगवान असला तरी त्याच्या मार्गात नेहमी अडथळे असतात. यावेळेस मान्सून अत्यंत मंद असून देशाच्या द्वीपकल्पाच्या १० टक्के भागात मान्सून ची सुरुवात झाली आहे.

मान्सूनची वाटचाल

मान्सूनची उत्तर सीमा पश्चिम घाटावरील रत्नागिरी, कोल्हापूर, आणि शिमोगा, सालेम, कुड्डालोरच्या जवळून जात आहे आणि कोलकाताला पूर्वेकडील गंगटोक व्यापत आहे.

आतापर्यंत, मान्सूनने पश्चिम घाट व्यापायला सुरुवात केली आहे, कारण एनएलएम कोच्चिकडून प्रथम, नंतर मंगळुरू आणि आता रत्नागैरी पुढे कोल्हापूरला जात आहे. तथापि, कर्नाटक आणि तमिळनाडुच्या फक्त काही भाग सलेम, कुड्डालोर पर्यंत मान्सून पोहोचला असून पूर्वेकडे तो आता कोलकाता येथे पोहोचला आहे.

तथापि, आता एक नवीन कमी दाबाच्या पट्यामुळे मान्सून तेलंगाणा, हैदराबाद, बेंगलुरू, कर्नाटक उर्वरित कर्नाटकसह महाराष्ट्रातील बहुतेक भाग तसेच आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम, आणि ओडिशातील काही भाग असा मोठा भूभाग व्यापणार आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try