देशातील तीन प्रमुख ऋतू म्हणजे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा यामध्ये पावसाळा सर्वाधिक महत्वाचा आहे, कारण हा ऋतू संपूर्ण वर्षाच्या हंगामाची दिशा ठरवतो.
पावसाळी हंगाम म्हणजे नैऋत्य मॉन्सून असा ऋतू आहे जो संपूर्ण भारताला प्रभावित करतो. पावसाच्या आगमनाची वाट शासन, सर्वसामान्य जनता, विशेषतः शेतकरी सगळेच पाहत असतात तसेच सगळेच जण हे जाणून घेण्यास उत्सुक असतात कि मॉन्सून कधी येणार आणि त्याचा प्रभाव संपूर्ण भारतावर कसा राहील.
भारतात, संपूर्ण वर्षातील एकूण ७० टक्के पाऊस, जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडतो. एकीकडे, पावसाची कमतरता लोकांना चिंतेत टाकते, दूसरीकडे, चागंल्या पावसाची बातमी ऐकून शेतकऱ्यांचे चेहरे उजळतात. तसेच, शासनाची देखील चिंता कमी होते.
स्कायमेटच्या मॉन्सून अहवालात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की संपूर्ण देशात मॉन्सूनच्या आगमनाची वेळ काय असते व मुख्यतः कोणत्या राज्यात मॉन्सून कधी पोहोचतो.
भारतात नैऋत्य मॉन्सूनची सुरुवात १ जून पासून होते. मॉन्सून केरळ पासून, चार महिन्याच्या लांब प्रवासावर निघतो. पावसाच्या पहिल्या टप्प्यात कोची, त्रिवेंद्रम आणि चेन्नईसह मॉन्सून तमिळनाडू पर्यंत पोहोचतो. तसेच, मॉन्सून उत्तर पूर्व राज्यांच्या सीमेला देखील स्पर्श करतो.
Also read in English: Curious as to when Monsoon arrives in your city, check out normal onset dates here
केरळमध्ये आगमनानंतर, साधारणतः मॉन्सूनची सुरूवातीची प्रगती ५ -५ दिवसांच्या अंतरावर असते. मॉन्सून ५ जून च्या दरम्यान दुसऱ्या टप्प्यावर पोहोचतो, ज्यामध्ये उत्तर कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश मधील जवळपास सर्व शहरांचा समावेश आहे. दरम्यान, आगरतळा, गुवाहाटी, शिलॉंग, इम्फाळ आणि दिसपुर समेत संपूर्ण उत्तर-पूर्व भारतात मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होते.
त्यानंतर १० जूनच्या सुमारास मुंबई आणि कोलकातासह, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाचे आगमन होते. याशिवाय, छत्तीसगढ, झारखंड आणि बिहारमधील काही भागात मॉन्सूनच्या पावसाचे ओझरते दर्शन होते.
मॉन्सूनचा पुढचा टप्पा पूर्व भारतातील भाग जसे गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड, येथे असतो. साधारण १५ जूनच्या आसपास रांची, पटणा, वाराणसी, प्रयागराज, भोपाळ, इंदौर, सूरत आणि अहमदाबाद या शहरांमध्ये पावसाची सुरुवात अनुभवली जाते. असे म्हणू शकतो कि १५ जून पर्यंत मॉन्सून सामान्यतः देशाच्या जवळपास निम्म्या भागात पोहोचलेला असतो.
हिन्दी में पढे: जानिए मॉनसून आपके शहर में कब देता है दस्तक
पुढचा टप्पा घेण्याआधी मॉन्सूनची प्रगती साधारणतः १५ दिवस संथ असते. त्यानंतर साधारणतः १ जुलै च्या आसपास उत्तर प्रदेश राज्याला पार करून दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरवर हजेरी लावतो.
याकाळात, राजस्थान आणि पंजाबचे बहुतांश भाग पण प्रभावीत होतात. तसेच लखनऊ, जयपूर, देहरादून, शिमला, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील अनेक शहरात पावसाची सुरुवात होते.
उर्वरित भागांमध्ये पावसाची सुरुवात होण्यास १५ दिवसांचा अवधी लागतो, आणि साधारणपणे १५ जुलै पासून पंजाब, हरियाणासह राजस्थानातील सर्व भागांमध्ये मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होते.
म्हणजेच, दक्षिण भारतापासून पश्चिम राजस्थानपर्यंत पोहोचायला मॉन्सूनला साधारणतः दीड महिन्याचा कालावधी लागतो.
स्कायमेटनी यापूर्वीच २०१९ मध्ये मॉन्सून ९३ टक्के म्हणजेच सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे