मुंबईकरांची आता लवकरच गरमी आणि घामाने हैराण करणाऱ्या वातावरणापासून सुटका होणार आहे. कारण मान्सून मुंबईच्या अगदीच जवळ येऊन पोहचलेला आहे.
नैऋत्य मान्सून गोव्यात ठरलेल्या वेळेत म्हणजेच ८ जूनला दाखल झाला असून मुंबईपासून काही इंचावर आहे असे म्हणायला हरकत नाही. साधारणपणे ११ जून ते १३ जून दरम्यान मान्सून मुंबईत दाखल होईल असा अंदाज आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अशोभा या चक्रीवादळामुळे आणि मान्सूनपूर्व काळात होणारा पाऊस गेले तीन दिवस मुंबईकर अनुभवत आहे. शहरात शनिवारी आणि रविवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला या पावसाची नोंद अनुक्रमे ०.२ मिमी आणि ४.५ मिमी करण्यात आली. सोमवारी मात्र फारसा पाऊस झालेला नाही.
मुंबई पावसाचे प्रमाण वाढत असून वातावरणात होणारे बदल हे नैऋत्य मान्सूनच्या आगमनासाठी पूरक आहेत. तसेच गेले चार ते पाच दिवस पुणे आणि लगतच्या भागात चांगलाच पाऊस होताना दिसून आला आहे.
भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार पश्चिम किनारपट्टीकडे नैऋत्य मान्सूनचा आतापर्यंतचा प्रवास समाधानकारक आहे. अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिमेकडे होणारा मान्सूनचा प्रवास बघता यापुढे मान्सुनची आगेकूच ठरलेल्या वेळेतच होईल अशी अपेक्षा आहे.
सध्या मान्सूनच्या उत्तरेकडील प्रवासाची भौगोलिक स्थिती १७.० अंश उत्तर/ ६०.० अंश पूर्व, १७.० अंश उत्तर/ ७०.० अंश पूर्व, तसेच रत्नागिरी, शिमोगा, म्हैसूर, सालेम, कुड्डलोर या पट्यातून अनुक्रमे पुढील अक्षांश रेखांशातून जात आहे १४.० अंश उत्तर/ ८६.० अंश पूर्व, १६.० उत्तर/ ९०.० पूर्व, २१.० अंश उत्तर/ ९२.० पूर्व, २४.० अंश उत्तर/ ९१.० अंश पूर्व पासून पुढे दुबरी आणि गंगटोकला जात आहे.
Image Credit: wsj.com