स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, नैऋत्य मान्सूनने केरळवर ८ जून रोजी कमकुवत आगमन केले आहे. सामान्यपणे केरळमध्ये मान्सून १ जून ला दाखल होतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण हवामान विषयक गतिविधींच्या अभावामुळे यावर्षी राज्यात खूप कमी पावसाची नोंद झाली. मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हि परिस्थिती कायम राहिल्यामुळे, परिणामी केरळवर मान्सूनच्या आगमनास उशीर झाला.
हवामानाच्या परिस्थितीमध्ये ४ जून रोजी बदल होण्यास सुरुवात झाली जेव्हा दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि आसपासच्या लक्षद्वीप बेटांवर चक्रवाती गतिविधींना सुरूवात झाली. ज्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलून ते पश्चिमेकडून यायला लागले, किनारी भागात या वाऱ्यांच्या अभावामुळे पावसाची सुरुवात नव्हती झाली. हे एक प्रमुख कारण होते जगप्रसिद्ध केरळच्या पावसाच्या विलंबाचे. दरम्यान जूनच्या सुरुवातीस पावसाळी गतिविधींमध्ये वेगाने वाढ झाली असली तरी मान्सून आल्याचे जाहीर करण्यासाठी पावसाचे निकष जुळत नव्हते.
निर्देशानुसार, केरळ लक्षद्वीप बेटे आणि कर्नाटकच्या किनारी भागातील १४ स्थानकांपैकी ६०% स्थानकांमध्ये सतत दोन दिवस प्रत्येकी २.५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली पाहिजे. हि परिस्थिती ६ आणि ७ जून रोजी उद्भवली, पावसाचा जोर वाढला आणि मान्सूनकरिता आवश्यक निकष पूर्ण झाला.
चक्रवाती प्रणालीमध्ये अजून बळकटी आल्यामुळे,ओएलआर आणि वाऱ्याबद्दलचे निकष देखील पूर्ण झाले. स्कायमेटनुसार, ७ जून रोजी केरळवर मान्सूनच्या आगमनाकरीता परिस्थिती अनुकूल होती.
मान्सूनची पुढची वाटचाल
मान्सूनला कमजोर सुरुवात झाल्यानंतर, पुढे येणारी आणखी एक मोठी समस्या म्हणजे मंद प्रगती होय. हवामान प्रारूपांच्या अनुसार देखील आगामी दिवसांत मान्सूनचा प्रवास संथ राहण्याची अपेक्षा आहे.
हवामानतज्ञांच्या मते, उपरोक्त चक्रवाती परिस्थिती मान्सूनसाठी शाप आणि वरदान देखील आहे. हि प्रणाली केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची जबाबदार पार पाडल्यानंतर, आता त्याच्या संथ प्रगतीसाठी देखील कारणीभूत असेल.
चक्रवाती प्रणाली अधिक संघटित होत आहे, ज्यामुळे दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर आणि लक्षद्वीप बेटांवर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रणाली अधिक सुसंघटित झाल्यामुळे, जवळपासच्या भागातील सर्व आर्द्रता ओढून घेईल. त्यामुळे केरळवरील पावसाचा जोर कमी होईल. खरं तर, ८ जून रोजीच्या आकडेवारीनुसार केरळमधील पाऊस आधीच कमी झाला आहे.
दरम्यान, मान्सूनच्या लाटेमुळे राज्यात पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. पूर्वी म्हटल्याप्रमाणे, मान्सूनचा जोर मजबूत असेल तर ते सर्व अडथळे पार करून चांगला पाऊस होतो. तथापि, आतापर्यंत असे झाले नाही.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे