[Marathi] मुंबईत मॉन्सूनचे आगमन उशिरा होणे अपेक्षित

May 31, 2019 11:55 AM | Skymet Weather Team

मुंबई मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पूर्व मॉन्सूनचा पाऊस अनुपस्थितच राहिलेला आहे. खरं तर, दक्षिण पश्चिम मॉन्सूनच्या निर्गमन नंतर मुंबईत पावसाची प्रगती संथ राहते.

सध्या मुंबईत गरम वारे वाहत आहे. याशिवाय, उष्णता पण अत्यधिक आहे. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचून गेला आहे. तथापि, सकाळच्या वेळी आकाशात ढगाळ दिसतात परंतु दिवस येत्या पुन्हा एकदा गरम वारे व उष्णता अनुभवण्यात येते.

Also read in English: Monsoon in Mumbai to be delayed, no rains for another week

याउलट, संध्याकाळ मात्र आनंददायी असून, रहिवाशांना दिवसभर च्या गरमी पासून काही काळ दिलासा मिळते.

खरं तर महाराष्ट्रातील बहुतांश भाग, मुखतः विदर्भ उष्णतेची लाट अनुभवत आहे. येथे पारा ४८ अंशाचा वरती पोहोचून गेला आहे.

मॉन्सूनच्या पावसा बदल सांगायचे तर, मुंबई मध्ये साधारणपणे मॉन्सूनच्या पावसाची सुरुवात १० जून पासून होते. त्याआधी, मे च्या शेवट पर्यंत पूर्व मॉन्सूनची सरी मुंबईत अनुभवण्यात येते.

परंतु, यावर्षी, हवामानाच्या परिस्थितीत जरा बदल दिसून आलेला आहे. आता पर्यंत मुंबईतील हवामान मात्र कोरडेच राहिलेले आहे. याशिवाय, सध्याची परिस्थिती पाहता असे नाही दिसून येत आहे की येणाऱ्या एक आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या भागात पाऊस पडेल. येथे पावसाची कमतरता अनुभवण्यात येत आहे.

दक्षिण पश्चिम मान्सून २०१९ चे आगमन केरळात जरा उशिराच होणार आहे. प्रभावामुळे, असे दिसून येत आहे की मॉन्सूनला मुंबई पर्यंत पोहोचायला जरा जास्तच वेळ लागेल आणि जून च्या तिसरा आठवड्याच्या आधी मॉन्सून मुंबईत दाखल होणे नाही अपेक्षित आहे.

मुंबईकरांना मॉन्सूनसाठी आणखीन वेळ थांबवा लागेल आणि गरम वारे व उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES