Skymet weather

[Marathi] मुंबईत मॉन्सून कधीही पोहोचणे अपेक्षित, चांगल्या पावसाची अपेक्षा

June 24, 2019 3:38 PM |

Mumbai monsoon

मुंबईत मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आता कधीही संपू शकते. गेल्या ४८ तासांत, मॉन्सून २०१९ ची प्रगती झाली आहे. मॉन्सून आधीच अलिबागपर्येंत पोहोचून गेला आहे व मॉन्सूनला पुढे जाण्यासाठी व मुंबईत प्रवेश करण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

मॉन्सून २०१९ चे आधीच उशिरा आगमन झाले आहेत आणि मॉन्सून आपल्या नियमित शेड्युलच्या १५ दिवस मागे आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, मुंबईवर सध्या पश्चिम दिशेने वारे वाहत आहे, ज्यामुळे तापमानात घट दिसून आलेली आहे, परंतु, मॉन्सूनच्या आगमनाची वेळ जवळ असली तरीही मुंबईत पावसाची कमतरता जाणवत आहे.

मॉनसूनच्या सुरुवातीस मुंबईमध्ये साधारणपणे जोरदार पावसाची नोंद होते. तथापि, या हंगामात मुंबईत अशा कोणत्याही परिस्थितीची अपेक्षा नाही आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, मुंबईत मॉन्सूनला जोरदार सुरुवात मिळण्याची अपेक्षा नाही आहे. तथापि, आगामी काही दिवसांत आम्ही मुंबईवर चांगल्या मध्यम स्वररूपाच्या पावसाची अपेक्षा करतो.

सध्या एक चक्रवाती परिस्थिती कर्नाटकच्या किनारी भागांवर बनलेली आहे ज्यामुळे मॉन्सूनचा उदय सक्रिय झाला आहे. ज्यामुळे, मुंबईकर जे गेल्या चार दिवसांपासून मुख्यतः कोरडे हवामान अनुभवत होते, एकदा पुन्हा पावसाचा आनदं घेतील.

सोमवारी तसेच मुंबईत पुढील काही दिवसांत मध्यम स्वररूपाच्या पावसाची अपेक्षा आहे. २६ जून रोजी पावसाचा जोर वाढेल व शहरात जोरदार पावसाची नोंद करण्यात येईल.

जून महिन्यात मुंबईसाठी ४९३.१ मिलीमीटर पावसाचा लक्ष्य आहे, ज्यामध्ये शहर आतापर्येंत १६५ मिमी पावसाचा लक्ष्य पूर्ण करण्यात सक्षम झाले आहे. परिस्थितीकडे पाहून असे दिसून येत आहे कि मुंबई शहर हे लक्ष्य चुकेल.

Image Credits – Pinterest

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try